---Advertisement---

गांगुली म्हणतो, त्याच्या बायोपिकमध्ये ‘या’ अभिनेत्याने करावे काम

On: बुधवार, डिसेंबर 4, 2019 2:48 PM
---Advertisement---

मागील काही वर्षांमध्ये अनेक क्रीडापटूंच्या जीवनावर आधारित चरित्रपट आले आहेत. त्यामध्ये मेरी कॉम, भाग मिल्खा भाग, सचिन: अ बिलियन ड्रीम्स आणि ते एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी अश्या प्रकारचे चरित्रपट आले आहेत.

तसेच आता कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 1983 साली मिळवलेल्या विश्वचषक विजेतेपदावर 83′ हा चरित्रपट काही महिन्यांत प्रदर्शित होणार आहे.

याबरोबर भारतात दिग्गज माजी कर्णधार सौरव गांगुलीचेही अनेक चाहते आहेत. त्यामुळे त्याच्यावर जर चरित्रपट बनला तर तो त्यांना पहायला आवडेल. त्यामुळे गांगुलीला नुकत्याच एका टॉक शोमध्ये विचारण्यात आले की जर त्याच्यावर चरित्रपट बनवला तर त्याची भूमिकेत कोणत्या अभिनेत्याला त्याला पहायला आवडेल?

यावेळी उत्तर देण्यासाठी वेळ न लावता गांगुली म्हणाला, “हृतिक रोशन, मला तो सर्वात जास्त आवडतो,”

गांगुलीच्या भारताने याआधी नेतृत्वाखाली अनेक मोठे विजय मिळवले आहेत. तो भारताच्या दिग्गज कर्णधारांमध्ये गणला जातो. तसेच सध्या गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहे.

ऋतिक रोशनने नुकताच आनंद कुमारच्या सुपर 30 या चरित्रपटात काम केले होते. तसेच काही दिवसांपूर्वी त्याचा ‘वॉर’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---