मुंबई । भारतात माजी कर्णधार सौरव गांगुली आणि इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन यांच्यात निवृत्तीनंतर चांगलीच मैत्री जमली आहे. आपआपल्या संघाकडून खेळाडू म्हणून खेळताना एकमेकांना त्यांनी चांगलीच टक्कर दिली होती. पण आजकाल ते एकमेकांचे नेहमीच कौतुक करत असतात.
96 कसोटी आणि 88 वनडे सामने खेळणारा नासिर हुसेनच्या मते, माजी कर्णधार सौरव गांगुलीनी भारताला जगात क्रिकेट पॉवर बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गांगुलीमुळेच भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती घडून आली.
पण याचदरम्यान सोशल मिडियावर सौरव गांगुली आणि नासिर हुसेन हे दोघेही एकमेकांना मस्तीमध्ये अनेकदा ट्रोल करत असतात.
शनिवारी सौरव गांगुलीने त्याचा अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक कोलाज केलेला फोटो शेअर केला होता. यामध्ये सौरव गांगुलीने २४ वर्षांपूर्वी कसोटी पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात शतक ठोकले होते, तेव्हाच्या क्षणांच्या आठवणींचे हे फोटोंचे कोलाज आहे.
https://twitter.com/SGanguly99/status/1274053095341920256
1996 साली लॉर्ड्सच्या मैदानावर 131 धावांची शतकी खेळी गांगुलीने साकारली होती. पहिल्याच कसोटी सामन्यात शतक करणारा तो दहावा फलंदाज बनला होता. या आठवणीचा कोलाज फोटो तर ट्विटरवर शेअर करताना “आयुष्यातील सर्वोत्तम क्षण” असे कॅप्शन त्याने दिले.
नासिर हुसेनने या ट्विटला उत्तर देताना लिहले की, ‘त्या आठवड्यात बॉलिंग करतानाचा कोणता फोटो नाही का?’ असे खोचक ट्विट केल्यानंतर मोहम्मद कैफने बस ड्रायव्हरचा किस्सा ट्विट करत नासिर हुसेनला ट्रोल केले.”
Hi @nassercricket I think you called someone a ‘bus driver.’ And in the end we all saw Dada’s 8-pack abs at the Lord’s balcony ???? #mymemories
— Mohammad Kaif (@MohammadKaif) June 19, 2020
No pictures of you bowling that week .. ????
— Nasser Hussain (@nassercricket) June 19, 2020
“यानंतर लागलीच सौरव गांगुली नॅटवेस्ट ट्रॉफीतील अंतिम सामन्यापूर्वी घेतलेला एक फोटो पोस्ट केला आणि ट्विटमध्ये लिहिले की, नासीर आठवण आहे का? हा फोटो कधी घेतला. वय जसे वाढत जाते तसे स्मरणशक्ती कमी कमी होत जाते.”
Hi Nass .. when was this picture taken .. losing memory with old age ????…need my mates help @nassercricket pic.twitter.com/LtVUFxw5N2
— Sourav Ganguly (@SGanguly99) June 19, 2020
“गांगुलीच्या ट्विटनंतर नासिर हुसेनने एक जीआयएफ शेअर केले. त्यानंतर पुन्हा सौरव गांगुलीने जीआयएफ शेअर केले आणि लिहले की, युवा नासिर हुसेन कर्णधारा विषयी विचार करत आहे. त्यावर नासिरने उत्तर दिले की, यांच्यापेक्षा चांगले की तू नाणेफेकीची वाट पाहतोय. यावर गांगुली म्हणाला मला नाणेफेक आवडते. तुम्ही खूपच सुंदर आहात. सुरक्षित राहा घरी राहा.”
I always protect my dear friends @nassercricket
— Sourav Ganguly (@SGanguly99) June 19, 2020
I like the toss one better ????.. very smart and humour intact .????..stay well mate ..stay safe ….
— Sourav Ganguly (@SGanguly99) June 19, 2020
दोघांच्या या जुगलबंदीनंतर क्रिकेट फॅन्सदेखील कॉमेंट्स करायला लागले.2002 साली लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला हरवले होते. या इंग्लंडने भारताला 326 धावांचे आव्हान दिले होते. मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांच्या भागीदारीच्या जोरावर एक ऐतिहासिक विजय मिळवला होता.






