भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी शनिवारी (24 सप्टेंबर) इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम वनडेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याला दुजोरा दिला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
भारतासाठी 200 पेक्षा जास्त वनडे खेळलेल्या झूलनने इंग्लंड दौऱ्यापूर्वी आपल्या निवृत्तीबद्दल फारसे काही बोलले नाही. तिने एक महिना अगोदर फक्त याची घोषणा केली होती. त्यानंतर तिचे काहीही वक्तव्य न आल्याने तिच्या निवृत्तीबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. झूलनची इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने निवड केली होती. मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर ती प्रथमच संघात परतली आहे.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना तिच्या निवृत्तीबद्दल विचारले असता ते म्हणाले,
” गेल्या दोन सामन्यांमध्ये तीने चांगली कामगिरी केल्याने मला खूप आनंद झाला आहे. भारतीय महिला संघाने चांगला खेळ करत मालिका जिंकली. कर्णधार हरमनप्रीत कौरसह संघातील सदस्यांशी संवाद साधल्यानंतर महिला क्रिकेटच्या विकासाबाबत माहिती घेतली.”
गांगुली पुढे म्हणाले, ‘”झूलन गोस्वामी एक दिग्गज आहे. आम्ही दोघेही बंगाली असल्याने तिच्याशी माझे चांगले संबंध आहेत. महिला क्रिकेटच्या विकासाबाबत मी झूलनशी नेहमी चर्चा करतो. याच मुद्द्यावर स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांच्याशीही माझे बोलणे झाले आहे. ती 40 वर्षाची झाली असून, प्रत्येक खेळाडूला कधीतरी थांबावेच लागते. लॉर्ड्ससारख्या ऐतिहासिक मैदानावर कारकिर्दीचा अखेरचा सामना खेळणे स्वप्नवत असते.”
झूलनने आपल्या जवळपास वीस वर्षाच्या कारकिर्दीत 300 हून अधिक बळी मिळवले आहेत. तसेच काही काळ तिला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी मिळाली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅप्टन रोहितची रिप्लेसमेंट तयार! रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या फलंदाजाने ठोकले नाबाद द्विशतक
दिल्ली-मुंबई जडेजाला आपल्या संघात घेण्यास उत्सुक; सीएसकेने दिले हे उत्तर