---Advertisement---

‘सर्व स्पष्ट आहे, तूम्हालाही लवकरच कळेल’, गांगुलीचे धोनीबद्दल मोठे भाष्य

On: शनिवार, नोव्हेंबर 30, 2019 7:54 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलने (Sourav Ganguly) माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या(MS Dhoni) भविष्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. गांगुलीने म्हटले आहे की धोनीच्या भविष्याविषयी निर्णय घेण्यासाठी अजून बराच वेळ आहे. पुढील काही महिन्यांत सर्व काही स्पष्ट होईल.

आयसीसी विश्वचषक 2019 नंतर धोनीच्या निवृत्तीबाबत बरीच चर्चा झाली आहे. परंतु अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

त्यामुळे याबाबत गांगुलीला विचारले असता तो म्हणाला, सर्वच गोष्टी सर्व गोष्टी सार्वजनिकरित्या सांगता येत नाहीत.

त्याचबरोबर, भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनीही काही दिवसापूर्वी म्हटले होते की, आयपीएल 2020 नंतर धोनीच्या भविष्याविषयीची स्पष्टता कळेल.

गांगुलीला याबाबत म्हणाला की, “काय होते ते पाहू. यासाठी अजून पुरेसा वेळ आहे. निश्चितच (काही महिन्यांत) चित्र स्पष्ट होईल.”

“गोष्टी स्पष्ट आहेत. परंतु, सार्वजनिक व्यासपीठावर काही गोष्टी सांगितल्या जाऊ शकत नाही. धोनीबद्दल संपूर्ण स्पष्टता आहे आणि वेळ येईल तेव्हा तुम्हालाही सर्व काही कळेल,” असे धोनीच्या भविष्याबद्दल बोलताना सौरव गांगुली म्हणाला.

“बीसीसीआय (BCCI), धोनी आणि निवडकर्ता यांच्यात पारदर्शकता आहे. जेव्हा अशा चॅम्पियन खेळाडूंबद्दल बोलता तेव्हा काही गोष्टी बंद दाराच्या आत ठेवाव्या लागतात. एमएस धोनी हा भारताचा अविश्वसनीय खेळाडू आहे. सर्व गोष्टी पारदर्शक आहेत आणि सर्व कोठे उभे आहेत हे प्रत्येकाला माहिती आहे,” असेही गांगुली पुढे म्हणाला.

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात धोनीनेही त्याच्या भविष्याबद्दल “जानेवारीपर्यंत विचारू नका” असे सांगितले होते.

धोनी भारताकडून शेवटचे 2019 विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळला आहे. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतलेली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---