---Advertisement---

सिडनी येथील कामगिरीने दादा खुश! म्हणाले ‘आता तुम्हाला समजले असेल की….’

On: मंगळवार, जानेवारी 12, 2021 12:39 PM
---Advertisement---

भारतीय संघाचे माजी कर्णधार व बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना काही दिवसांपूर्वीच हृदयात वेदना जाणवल्याने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. आता गांगुली यांची प्रकृती उत्तम असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गांगुली यांना विश्रांती घेण्याचा सल्ला मिळाल्याने आयसीसीच्या मिटिंगमध्ये देखील ते सहभागी होणार नाहीत. मात्र या सर्व परिस्थितीत गांगुली यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात झालेल्या सिडनी कसोटीचा आनंद लुटला आहे. भारतीय संघाच्या उत्तम कामगिरीनंतर त्यांनी ट्विटरवर आनंद व्यक्त करत भारतीय संघाला मालिका विजय मिळवण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गांगुली यांनी ट्विटरवर लिहिले, “आशा करतो की तुम्हाला समजले असेल की संघांमध्ये पंत, पुजारा आणि अश्विनचे काय महत्त्व आहे. नंबर 3 वर फलंदाजी करताना उत्तम गोलंदाजी विरुद्ध केवळ शॉट खेळणे गरजेचे नसते. 400 विकेट सुद्धा सहजासहजी मिळत नाहीत. जबरदस्त खेळ केला टीम इंडिया. आता मालिका विजय मिळवण्याची वेळ आहे. ”

सिडनी कसोटी अनिर्णित राखण्यात भारताला यश – 

सिडनी कसोटीमध्ये पहिल्या चार दिवसात ऑस्ट्रेलियन संघाचे वर्चस्व होते. त्यामुळे पाचव्या दिवशी हा सामना ऑस्ट्रेलिया जिंकेल असे सर्वांना वाटले होते. पाचव्या दिवशी भारताला 309 धावांची गरज होती. तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 8 विकेट्स हव्या होत्या. त्यातही पाचव्या दिवशी अजिंक्य रहाणे लवकर बाद झाला. मात्र त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी दमदार शतकी भागीदारी उभारली. या दोघांनीही 148 धावांची भागीदारी करताला भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण पंत 97 धावांची तुफानी खेळी करुन तर पुजारा 77 धावांची खेळी करुन दुसऱ्या सत्रात बाद झाले.

असे असतानाही आर अश्विन आणि विहारी या जोडीने शेवटपर्यंत झुंज दिली आणि २५० पेक्षाही अधिक चेंडू खेळून काढत नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. याबरोबरच त्यांनी हा सामना अनिर्णित राखत भारताचे या मालिकेतील आव्हान कायम ठेवले.

आता कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना 15 जानेवारी रोजी ब्रिस्बेन येथे खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

भारतीय संघाने सामना अनिर्णित राखल्यानंतर ‘अशी’ होती स्टीव स्मिथची प्रतिक्रिया, म्हणाला…

डर्टी गेम केल्यानंतर हे तर होणारच होतं! सिडनी कसोटीत सामनावीर ठरल्यानंतर चाहत्यांनी स्मिथला म्हटलं ‘गद्दार’

विहारी-जडेजा आऊट; तर बुमराह खेळण्याची शक्यता कमी, अशी असेल ब्रिस्बेन कसोटीतील भारताची प्लेइंग XI

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---