---Advertisement---

गांगुली म्हणतो, असे केले तर पाऊस पडल्यानंतर १० मिनीटात सुरु होईल सामना

On: शुक्रवार, जून 14, 2019 7:02 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या सुरु असलेल्या 2019 विश्वचषकात पावसाचा सातत्याने व्यत्यय येत आहे. आत्तापर्यंत या विश्वचषकात झालेल्या 18 सामन्यांपैकी तब्बल 4 सामने पावसामुळे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे चाहत्यांकडून आयसीसीवर टीका होत आहे.

नुकताच काल(13 जून) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील सामनाही पावसामुळे नाणेफेकही न होता रद्द झाला आहे. या सामन्याच्यावेळी स्टार स्पोर्ट्स या सामना प्रसारण करणाऱ्या चॅनेलवर बोलताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला, जर कव्हर बदलले तर परिस्थिती बदलली जाऊ शकते.

गांगुली म्हणाला, ‘भारतात इडन गार्डनवर इंग्लंडमधील कव्हर्सच वापरले जातात. इथे(इंग्लंड) हे कव्हर्स वापरणे म्हणजे अर्धा खर्च करण्यासारखे आहे आणि ते कर-मुक्तही आहे. त्यामुळे हे कव्हर्स इथे वापरले पाहिजे. भारतात सर्व सामन्यांसाठी हे कव्हर्स वापरले जातात. त्यामुळे जेव्हाही पाऊस थांबतो तेव्हा सामना 10 मिनीटात सुरु होऊ शकतो.’

‘ते वजनानेही हलके कव्हर्स आहेत. त्यांना उचलणे कठीण नाही आणि त्यामुळे मनुष्यबळही खूप लागत नाही.’

भारतात फक्त खेळपट्टी नाही तर थर्टी यार्ड सर्कलही झाकण्याची सुरुवात गांगुलीने बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर केली होती.

गांगुलीने इडन गार्डनवर वापरण्यात येणाऱ्या कव्हर्सबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की ‘इडन गार्डन आणि लॉर्ड्सवर वापरण्यात येणारे कव्हर पारदर्शक असून त्यातून प्रकाश जमीनीपर्यंत पार होतो. त्यामुळे मैदानावरील गवत सुकत नाही आणि त्याचा रंगही हिरव्यावरुन तपकिरी होत नाही. त्यामुळे तूम्ही मैदान झाकण्यासाठी त्याचा वापर करु शकता.’

‘विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत आणि महत्त्वाच्या सामन्यांमध्ये आणि विशेषत: इंग्लंडमध्ये, जिथे पाऊस वारंवार येत असतो, त्यामुळे हे कव्हर खूप महत्त्वाचे आहेत.’

पण याबरोबरच गांगुलीने हे देखील मान्य केले की भारत आणि न्यूझीलंडमधील सामना होणे कदाचीत शक्य नव्हते. कारण मागील तीन दिवसापासून इथे पाऊस पडत होता. तसेच ढगाळ वातावरणामुळे अंधार दाटून आला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक २०१९ नंतरही इतके दिवस रवी शास्त्री असणार टीम इंडियाचे कोच…

२०११ला रस्त्यावर केले होते सेलिब्रेशन आता लॉर्ड्वर विश्वचषक उंचवण्यास उत्सुक आहे हा खेळाडू

विश्वचषक २०१९: भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी असे असेल हवामान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment