भारतीय क्रिकेट संघाच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जाणारा माजी संघनायक एमएस धोनी, आज आपला ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. कर्णधाराच्या रुपात धोनीने अनेक असे विक्रम नोंदवले आहेत, जे आजही अबाधित आहेत. क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात आयसीसीचे चषक पटकावण्याचा अप्रतिम पराक्रम त्याच्या नावे आहे. यातीलच एक अविस्मरणीय विजय म्हणजे, २०११ चा वनडे विश्वचषक. माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यानेही २८ वर्षांनंतर भारताने केलेला हा पराक्रम त्याच्यासाठी विशेष असल्याचे सांगितले आहे.
काही दिवसांपुर्वी एका कार्यक्रमात बोलताना गांगुलीने यासंबंधी भाष्य केले होते. २०११ चा वनडे विश्वचषक विजय आणि धोनीने या विजयासाठी अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध मारलेला विजयी षटकार, नेहमीच त्याच्या स्मरणात राहतील, असे त्याने सांगितले होते.
तो म्हणाला होता की, “माझ्यासाठी तो दिवस खूप मोठा होता, जेव्हा भारतीय संघाने २०११ चा वनडे विश्वचषक पटकावला होता. महान क्रिकेटपटू एमएस धोनीने शेवटच्या चेंडूवर अप्रतिम षटकार खेचत भारताला जेतेपद मिळवून दिले होते. तो क्षण खरच खूप अप्रतिम होता. हे क्षण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नेहमीच अविस्मरणीय राहणार आहेत.”
“मला अजूनही आठवण आहे की, मी त्या रात्री वानखेडेमध्ये उपस्थित होतो. जेव्हा धोनीने तो विजयी षटकार मारला, तेव्हा मी तो क्षण पाहण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समधून उठून बाहेर आलो होतो. संपूर्ण संघ मैदानाच्या चारी दिशांनी फिरत आनंदाचा जल्लोष साजरा करत होता. जेव्हा २००३ मध्ये मी संघाचा कर्णधार होतो, तेव्हा अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या हातून आमचा पराभव झाला होता. त्यामुळे धोनीने चषक जिंकल्यानंतर मी खूप आनंदी झालो होतो,” असेही त्याने सांगितले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
ज्या शहरात पोरं आयआयटी, जीईई, यूपीएससीचा अभ्यास करायची, तिथलं जगच धोनीने बदललं
सुरेख भेट! जाळ अन् धूर संगठच काढत चाहत्याने धोनीसाठी बनवले अतिसुंदर गिफ्ट; एकदा पाहाच
श्रीलंकेहून आली आनंदाची बातमी, हार्दिक पंड्या ‘बहुप्रतिक्षित’ भूमिकेत मैदानावर उतरणार