भारताचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुली आणि माजी फलंदाज सचिन तेंडूलकर यांच्यातील मैत्री सर्वांनाच माहित आहे. पण हे दोघेही14 वर्षांचे असल्यापासून मित्र असल्याचा नवीन खुलासा गांगुलीने केला आहे.
त्यांच्या या मैत्रीच्या काही आठवणी गांगुलीने ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या चॅटशो मध्ये सांगितल्या आहेत.
14 वर्षांचे असताना इंदोरमध्ये एका कॅम्पदरम्यानची मजेदार आठवण सांगताना गांगुली म्हणाला, “14 वर्षांचा असताना एका नॅशनल कॅम्पला होतो, त्यावेळी एकदा मी आणि माझा रुममेट रविवारी दुपारी झोपलो होतो. कारण वासू परांजपे सर आमच्याकडून खुप मेहनत करुन घ्यायचे.”
“त्यावेळी मी 5 वाजता उठलो आणि बघितले की खोलीत सगळीकडे पाणीचपाणी झाले आहे. सुटकेसपण पाण्यावर तरंगत होते. त्यामुळे मला वाटले की बाथरुममधील पाईप फुटला असावा. म्हणून मी बाथरुममध्ये जाऊन पाहिले पण ते तर कोरडे होते.”
“त्यानंतर मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिले कि बाहेर सचिन आणि विनोद कांबळी पाण्याची बादली घेऊन उभे होते. ते आणखी पाणी आत टाकणार होते. त्यावर मी त्यांना विचारले की काय आहे हे. यावर ते दोघे मला म्हणाले, दुपारी का झोपला तू? चल टेनिस बॉलने क्रिकेट खेळू.”
यावेळी गांगुलीने असेही सांगितले की त्या कॅम्पमध्ये पहिल्यांदा सचिनला पाहिले होते. त्याआधी त्याचे नाव खूप ऐकले होते. तसेच गांगुलीने सचिनच्या झोपेत चालण्याच्या सवयीबद्दलही सांगितले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–बापरे! विराटबरोबर ५७ धावांची भागीदारी करणाऱ्या फलंदाजाने केली केवळ १ धाव
–विराट वादळात फारसा लक्षात न आलेला अश्निनचा हा कारनामा पहाच
–जगाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करणारा विराट केवळ चौथा भारतीय