भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli)याने 2022चा शेवट आणि 2023ची सुरूवात शतकाने केली. त्याने घरच्या मैदानावर सुरू असलेल्या वनडे मालिकेत श्रीलंकेविरुद्ध शतक ठोकले. त्याने हे शतक मंगळवारी (10 जानेवारी) झालेल्या पहिल्या सामन्यात केले होते. ते त्याच्या वनडे कारकिर्दीतील 45वे शतक ठरले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वनडे शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. त्याने 49 शतके केली. त्यामुळे विराटने शतक करताच चाहते त्याची तुलना सचिनशी करू लागले. या चर्चेत भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली याने आपले मत व्यक्त केले आहे.
गांगुलीने विराट विरुद्ध सचिन असे सुरू असलेल्या चर्चासत्राबाबत पीटीआयशी बोलताना म्हटले, “सचिन की विराट कोण सर्वोत्तम याचे उत्तर देणे कठीण आहे. विराट कोहली एक शानदार खेळाडू आहे. त्याने अनेक सामने खेळले असून 45 शतके काही अशीच झाली नाहीत. तो एक कौशल्यपुर्ण आहे. कधी काळ असा येईल तो धावा करण्यात अपयशी ठरेल, मात्र तो एक खास खेळाडू आहे.”
गुवाहाटीच्या बरसापरा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या त्या सामन्यात विराटने 87 चेंडूत 113 धावा केल्या. यामुळे भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 374 धावांचे लक्ष्य ठेवले. त्या सामन्यात विराटने उत्तम फलंदाजी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे 73वे शतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (100) तेंडुलकरच्या नावावर आहेत. त्याचबरोबर तो वनडे प्रकारमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही आहे. सचिनने 463 सामन्यात 18426 धावा तर विराटने 266 सामन्यात 12584 धावा केल्या आहेत. विराट आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका याने नाबाद शतकी खेळी केली, मात्र संघाला 50 षटकात 8 विकेट्स गमावत 306 धावा करता आल्या. यामुळे भारत 67 धावांनी विजयी झाला आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक क्रिकेट स्पर्धेत स्टार क्रिकेट अकादमी विजयी
वर्ल्ड सुपर लीगच्या गुणतालिकेत न्यूझीलंडने भारताला टाकले मागे, पाकिस्तानचेही नुकसान