गुवाहाटीच्या बरसापरा क्रिकेट स्टेडियममध्ये मंगळवारी (10 जानेवारी)भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL)वनडे मालिकेतील पहिला सामना रंगला. या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने शतकी खेळी केली. त्याने 87 चेंडूत 113 धावा केल्या. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील 45वे शतक ठरले, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील 73वे शतक ठरले. शतकी खेळी करताना त्याने अनेक विक्रम रचले, मात्र या 45 शतकांपैकी किती शतके सामन्यात विजयाचे कारण ठरली हे आपण जाणून घेऊ.
विराटने ऑगस्ट 2008मध्ये श्रीलंकेविरुद्धच वनडे पदार्पण केले होते. त्याने या प्रकारातील पहिले शतक 2009मध्ये श्रीलंकेविरुद्धच केले होते. कोलकाताच्या इडन गार्डनवर झालेल्या त्या सामन्यात विराटने 107 धावा केल्या होत्या. आतापर्यंत त्याने 45 शतक केले असून 44वे शतक बांगलादेशच्या दौऱ्यात केले होते. त्या सामन्यातही त्याने 113 धावा केल्या होत्या. तसेच त्याने तीन वर्षानंतर सलग दोनदा शतकी खेळी करण्याचा विक्रम केला. याआधी त्याने 2019मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये 120 आणि नाबाद 114 धावा केल्या होत्या.
विराटने वनडेमध्ये तब्बल 37 अशा शतकी खेळी केल्या ज्या भारताच्या विजयाचे कारण ठरल्या. सचिनने त्याच्या कारकिर्दीत एकूण 49 वनडे शतके केली आहेत, त्यातील 35 शतके भारत विजयाचे कारण ठरले. या विक्रमालाही विराटने मागे टाकले आहे. तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटींग आहे. त्याने केलेल्या 30 वनडे शतकांपैकी 25 शतक असे होते ज्यामध्ये संघ जिंकला.
विराट सध्या सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर, वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर (49) याच्यानंतर दुसऱ्या स्थानावर, घरच्या मैदानावर सर्वाधिक वनडे शतके (20) करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर, श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक वनडे शतके (9) करणारा, जेव्हा संघाने वनडे सामन्यात 300 पेक्षा अधिक धावसंख्या उभारली त्या सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके (21) करणारा खेळाडू असे अनेक विक्रम विराटने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात केले. Virat Kohli has the most hundreds in winning cause in ODI history
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शतकीय खेळीसाठी विराटला आयसीसीकडून बक्षीस, श्रीलंकेविरुद्ध 84 धावा कुटणाऱ्या रोहितही फायद्यात
रेकॉर्डब्रेक सूर्या! आयसीसी क्रमवारीत पहिल्यांदाच केली ‘ही’ कामगिरी, विराटला कधी जमलेच नाही