भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका मंगळवारी (10 जानेवारी) मायदेशात सुरू झाली. उभय संघांतील पहिला सामना गुवाहाटीमध्ये खेळला गेला, जो भारताने 67 धावांच्या अंतराने नावावर केला. संघाला मिळालेल्या विजयात कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांचे योगदान महत्वाचे राहिले. या दोघांना त्यांच्या वादळी फलंदाजीसाठी आयसीसीकडून बक्षीस देखील मिळाले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक गमावल्यानंतर संघाने प्रथम फलंदाजी केली. रोहितने संघाला चांगली सुरुवात देत 67 चेंडूत 83 धावा कुटल्या. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट कोहली (Virat Kohli) शतकीय खेळी करू शकला. विराटने 87 चेंडूत 113 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त शुबमन गिल यानेही 70 धावांचे योगदान दिले. फलंदाजांच्या ताबडतोड खेळीनंतर संघाची धावसंख्या 50 षटकात 7 बाद 373 होती. बुधवारी (11 जानेवारी) जाहीर झालेल्याय आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत रोहित आणि विराटला वनडे फलंदाजांच्या यादीत फायदा झाला.
मंगळवारी शतक ठोकल्यानंतर विराटला आयसीसीच्या वनडे क्रमवारीत दोन स्थानांची फायदा झाला. विराट आधी आठव्या क्रमांकावर होता, जो बुधवारी सहाव्या क्रमांकावर पोहोचला. दुसरीकडे रोहित शर्मा देखील 9 व्या क्रमांकावर आठव्या क्रमांकावर पोहोचला. ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथ याला विराटच्या शतकामुळे नुकसान सोसावे लागले. स्मिथ सहाव्या क्रमांकावर सातव्या क्रमांकावर घसरला. तर रोहितमुळे इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोला नुसकान झाले. बेअरस्टो एका स्थानाच्या नुकसानासह 9 व्या क्रमांकावर घसरला. वनडे क्रमवारीत पहिला क्रमांकावर पाकिस्तानच्या बाबार आझकडे कायम आहे. विराट आणि रोहितकडे अनुक्रमे 726 आणि 715 रेटिंग पॉइंट्स आहेत, तर पहिल्या क्रमांकावरील बाबरकडे 891 रेटिंग गुण आहेत.
वनडे क्रमवारीतील पहिले 10 फलंदाज
बाबर आझम (पाकिस्तान) – 891 रेटिंग गुण
रासी वॅन डर ड्यूसेन (दक्षिण आफ्रिका) – 766 रेटिंग गुण
इमाम उल हक (पाकिस्तान) – 764 रेटिंग गुण
क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) – 759 रेटिंग गुण
डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – 747 रेटिंग गुण
विराट कोहली (भारत) – 726 रेटिंग गुण
स्टीव स्मिथ (ऑस्ट्रेलिया) – 719 रेटिंग गुण
फखर जमा (पाकिस्तान) – 695 रेटिंग गुण
(virat-kohli-and-rohit-sharma-have-benefited-after-the-first-odi-against-Sri Lanka)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नादच नाद! ‘त्रिशतकवीर’ पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीत रचला इतिहास, केले अनेक रेकॉर्ड्स
काय सांगता, उमरानचा ‘तो’ चेंडू सर्वात वेगवान नव्हताच! क्रिकेटविश्वात नव्या वादाला सुरूवात






