भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बुधवारी (१ जून) संध्याकाळी केलेल्या एका ट्विटने सर्वत्र चर्चांना उधान आलं होते. सौरव गांगुली यांनी ट्विट करत एक गुगली टाकली. त्यानंतर गांगुली क्रिकेट प्रशासनातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सर्वत्र होत होत्या. मात्र, आता बीसीसीआय सचिव जय शहा यांनी या चर्चांना पूर्णविराम देला आहे,
गांगुली यांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, “नवीन सुरुवात केली जात आहे, त्याला अनेक लोक मदत करतील.” यानंतर सोशल मीडियावर गांगुली बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण काही हे खरे नाही. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले की, गांगुली असे काही करणार नाहीत.
खरंतर या ट्विटच्या काही तास आधी सौरव गांगुलीने स्वत: त्याच्या ट्विटरवर एक पोस्ट केली होती. यामध्ये त्याने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्याने त्याच्या नवीन इनिंगचा म्हणजेच रिअल इस्टेट कंपनीसोबतच्या भागीदारीचा उल्लेख केला आहे. कंपनीचे नाव जॉयविले होम्स आहे, ज्याचा फोटो गांगुलीने शेअर केला. त्यामुळे आता गांगुली निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Success is not a destination but a journey that begins at @JoyvilleHomes. Stay tuned to find out more. #LiveToWin #BrandCollaboration pic.twitter.com/QnvmekVm0c
— Sourav Ganguly (@SGanguly99) June 1, 2022
दरम्यान, महत्त्वाचे म्हणजे सौरव गांगुली यांची ऑक्टोबर २०१९मध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. याआधी ते बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही होते. एक कर्णधार म्हणून त्यांनी भारतीय क्रिकेटला मोठ्या उंचीवर नेले. यानंतर, व्यवस्थापनात येताच त्यांनी असे अनेक निर्णय घेतले, ज्याचा भारतीय क्रिकेटला खूप फायदा झाला. अलीकडेच, आयपीएल संपल्यानंतर, त्यांनी सर्व मैदानावरील ग्राउंड स्टाफसाठी बक्षीस रक्कम जाहीर करून सर्वांची मने जिंकली होती.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘लॉर्ड’ ठाकूरच्या शब्दामुळे युवा स्पिनरला मिळाली आयपीएल पदार्पणाची संधी, स्वतः केला खुलासा
‘बंद करा त्या टी-२० मालिका, फक्त विश्वचषक खेळवा’, असं का म्हणाले रवी शास्त्री? जाणून घ्या सविस्तर