---Advertisement---

सौरव गांगुलीने साडेचार महिन्यात केलेल्या कोरोना चाचण्यांचा आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

---Advertisement---

कोरोनाच्या संकटकाळात क्रीडा स्पर्धा अत्यंत सुरक्षिततेची काळजी घेऊन खेळवल्या जात आहेत. खेळाडूंसाठी जैव सुरक्षित वातावरण तयार केले जात आहे. एवढेच नाही तर यासाठी काही नियमही तयार करण्यात आले असून खेळाडूंनी, अधिकाऱ्यांची नियमित कालांतराने कोरोना चाचणी होत आहे. नुकत्याच युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएल हंगामादरम्यानही या सर्व गोष्टींची खबरदारी घेण्यात आली. याबद्दल बोलताना बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने खुलासा केला की त्याला मागील ४ महिन्यात कितीवेळा कोरोना चाचणी करावी लागली.

एका वर्च्यूएल पत्रकार परिषदेत गांगुलीने सांगितले की ‘मी तुम्हाला सांगतो की गेल्या साडेचार महिन्यांत मी कोविड -१९ चाचणी २२ वेळा केली आहे आणि ती एकदाही पॉझिटिव्ह आली नाही. माझ्या आजुबाजूचे लोकं कोविड -१९ पॉझिटिव्ह सापडले आहेत, त्यामुळे मला कोविड -१९ चाचणी करावी लागली.’

गांगुली पुढे म्हणाला, ‘मी माझ्या वृद्ध आई-बाबांबरोबर रहातो आणि मी दुबईचा प्रवास केला आहे. सुरुवातीला मी चिंतीत होतो, स्वत:साठी नाही तर आजूबाजूंच्या लोकांसाठी. तुम्हाला कोणाला संक्रमित करायचे नसते.’

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज – गांगुली

गांगुलीने २७ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दलही भाष्य केले. तो म्हणाला, ‘खेळाडू फिट आहेत आणि ठिक आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये जिथे सीमा बंद केल्या होत्या. तिथेही आता कोविड-१९ ची प्रकरणेही अधिक नाहीत. तरीही ते आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबत कठोर आहेत. तुम्हाला १४ दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये राहणे अनिवार्य आहे. आता खेळाडू मैदानात उतरण्यासाठी तयार आहेत.’

आयपीएलचे यशस्वी आयोजन –

बीसीसीआयचा अध्यक्ष गांगुली पुढे असेही म्हणाला की आयपीएल २०२० चे आयोजन युएईमध्ये यशस्वी केल्याचा अभिमान आहे आणि आशा आहे की पुढील हंगाम भारतातच होईल. तो म्हणाला, ‘जैव सुरक्षित वातावरणात ४०० जण होते. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी अडीच महिन्यात ३०-४० हजार परिक्षण करण्यात आले.’

कोरानापासून सतर्क रहायला हवे.

गांगुली म्हणाला, ‘जेव्हा सामने आठ, नऊ किंवा दहा संघात होतात तेव्हा हे अधिक कठिण होते. आपल्याला परिस्थिती समजून घ्यावी लागेल. कारण अनेक जण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल बोलत आहेत. मी ऐकले की मुंबई आणि दिल्लीमध्ये संख्या वाढली आहे. त्यामुळे आपल्याला थोडे सतर्क राहावे लागेल.’

महत्त्वाच्या बातम्या –

आयसीसीला मिळाला नवा अध्यक्ष; मतदानात ‘या’ व्यक्तीने मारली बाजी

कसोटी मालिकेत विराटच्या अनुपस्थितीबद्दल सचिन तेंडुलकरचे मोठे भाष्य, म्हणाला…

वाढदिवसाच्या दिवशीच हॅट्रिक घेणारा जगातील एकमेव गोलंदाज

ट्रेंडिंग लेख –

१९ वर्षीय पार्थिव पटेल थेट ऑस्ट्रेलियात स्टीव्ह वॉला नडला पण…

ऑस्ट्रेलियातील मैदान दणाणून सोडलेले भारताचे ‘हे’ तीन वाघ! अन् त्यांच्या ‘या’ अफलातून इनिंग माहितीये का?

वनडे मालिकेत ‘या’ तिघांना बसावे लागू शकते बाकावर; गिलचाही समावेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---