भारताचा माजी दिग्गज फलंदाज व्हिव्हिएस लक्ष्मणसाठी इडन गार्डन, कोलकता येथे 2001 मध्ये केलेली 281 धावांची खेळी खास ठरली होती. पण हीच खेळी त्यावेळीचा भारताचा कर्णधार सौरव गांगुलीसाठीही वेगळ्या अर्थाने खास ठरली होती.
याबद्दल २०१८मध्ये कोलकतामध्ये लक्ष्मणच्या 281 अॅन्ड बियॉन्ड या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात गांगुली म्हणाला होता की लक्ष्मणच्या त्या खेळीने माझी कारकिर्द वाचवली होती.
त्या खेळीच्या आठवणीमुळेच लक्ष्मणने त्याच्या आत्मचरित्राचे नाव 281 अॅन्ड बियॉन्ड असे ठेवले आहे. पण हे नाव बदलावे असेही गांगुलीने लक्ष्मणला सुचवले होते.
गांगुली म्हणाला, ‘मी त्याला एक महिन्यापूर्वी संदेश लिहिला होता पण त्याने मला त्याचे उत्तर दिलेले नाही. मी त्याला म्हटले होते की शीर्षक असे नाही तर ‘281 अॅन्ड बियॉन्ड अॅन्ड दॅट सेव्ह सौरव गांगुली करियर’, (गांगुलीची कारकिर्द वाचवली )असे असायला हवे होते.’
‘मी त्याला त्याच्या शीर्षकासाठी खरचं विरोध केला होता. कारण जर त्याने 281 धावा केल्या नसत्या तर आम्ही कसोटी पराभूत झालो असतो आणि मी पुन्हा कधीही नेतृत्व केले नसते.’
भारतीय संघ 2000 मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे संघर्ष करत होता. त्यावेळी गांगुलीने भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकारली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला होता.
या दौऱ्यात कसोटी मालिकेतील मुंबईत झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत आघाडी घेतली होती. तसेच कोलकता कसोटी भारताला फॉलोआॅन दिला होता. या फॉलोआॅननंतर लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांच्या जोडीने 376 धावांची भागीदारी रचत भारताला विजय मिळवून दिला होता. त्यावेळी लक्ष्मणने 281 आणि द्रविडने 180 धावा केल्या होत्या.
या विजयामुळे भारताने स्टिव्ह वॉच्या ऑस्ट्रेलियन संघाची सलग 16 विजयांची मालिका खंडीत केली होती. तसेच या विजयामुळे गांगुलीच्या नेतृत्वालाही वेगळी दिशा मिळाली होती. त्यामुळे हा सामना गांगुलीसाठी खास होता.
कोलकतामधील कार्यक्रमात पुढे गांगुली म्हणाला होता की लक्ष्मणला वनडेमधून वगळणे ही चूक होती. लक्ष्मणला 2003 च्या विश्वचषकातून वगळण्यात आले होते. लक्ष्मणने त्याच्या कारकिर्दीत फक्त 86 वनडे सामने खेळले आहेत.
याबद्दल गांगुली म्हणाला, ‘लक्ष्मण असा खेळाडू आहे जो कोणत्याही प्रकारात चांगले खेळू शकतो. त्यामुळे ती (लक्ष्मणला वगळणे)कदाचीत चूक होती. कर्णधार म्हणून तूम्ही निर्णय घेता आणि काही गोष्टी घडतात ज्या कदाचीत बरोबर किंवा चूक असू शकतात.’
लक्ष्मणसाठी हा वाईट काळ होता. त्यामुळे तो जेव्हा त्याच्या मित्रांबरोबर यूएसएला फिरायला गेला होता तेव्हा त्याने क्रिकेट थांबवण्याचाही विचार केला होता.
याविषयी लक्ष्मण म्हणाला होता की, ‘पण मला नंतर जाणवले की मी कदाचीत विश्वचषकासाठी बनलेला खेळाडू नसेल पण मी या खेळासाठी आहे. मी लहानमुलासारखा वागलो होतो. मी स्वत:ला सांगितले की मी काही नशिबान खेळाडूंपैकी एक आहे ज्यांना ही संधी मिळाली आहे आणि मला ती गमवायची नाही.’
तसेच कोलकता कसोटीबद्दल लक्ष्मण म्हणाला होता की त्या कसोटीत प्रत्येकाने त्यांचे योगदान दिले होते होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-अख्तरने केला होता जगाला चक्रावुन टाकणारा विक्रम, पण आयसीसी झाली होती व्हिलन