काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(BCCI) ( बीसीसीआयने) विराट कोहलीबाबत (Virat Kohli) एक मोठा निर्णय घेतला होता. टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले आहे. या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्य झाले होते. तर विराट कोहली आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (sourav ganguly) यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती. ज्यामध्ये आता सौरव गांगुलीने विराट कोहलीच्या ॲटीट्युडबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
गुरुग्राममध्ये एक इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये सौरव गांगुली यांनी देखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांना विचारण्यात आले होते की, असा कुठला खेळाडू आहे, ज्याचा ॲटीट्युड तुम्हाला खूप जास्त आवडतो? याचे उत्तर देत सौरव गांगुली यांनी म्हटले की, ” मला विराट कोहलीचा ॲटीट्युड खूप आवडतो. पण तो आजकल खूपच भांडतोय.”
तसेच या इव्हेंटमध्ये सौरव गांगुली यांना असाही प्रश्न विचारण्यात आला होता की, तुम्ही आयुष्यातील सर्व ताणतणावांचा सामना कसा करता? यावर व्यंगात्मक प्रतिक्रीया देत सौरव गांगुली म्हणाले की, “आयुष्यात ताणतणावच नाहीये.” विराट कोहलीच्या वादाबद्दल बोलताना गांगुली म्हणाले की, “मला या प्रकरणावर काही बोलायचं नाहीये. ही बाब बीसीसीआयची आहे आणि ते त्यावर निर्णय घेतील.”
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सौरव गांगुली आणि विराट कोहली यांचा वाद पाहायला मिळाला होता. विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आहे. याबाबत बोलताना सौरव गांगुली यांनी म्हटले होते की, “मी विराट कोहलीला कॉल करून टी२० संघाचे कर्णधारपद सोडू नको अशी विनंती केली होती.” यावर विराट कोहलीने म्हटले की, ” ८ डिसेंबर रोजी कसोटी मालिकेसाठी संघाची निवड करण्यात आली होती. ही बैठक होण्याच्या दीड तासांपूर्वी मला संपर्क करण्यात आला होता. त्यावेळी मला कर्णधार पदावरून काढून टाकण्याची माहिती देण्यात आली होती. टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर मला कोणी ही संपर्क केला नव्हता.”
महत्वाच्या बातम्या :
बीसीसीआय-विराट वाद रंगला असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा; दिले ‘हे’ कारण
राष्ट्रीय वरिष्ठ हॉकी स्पर्धा: पेनल्टी शूट-आउटमध्ये तमिळनाडूचा पराभव करत महाराष्ट्र उपांत्य फेरीत
अश्विन म्हणतोय, “तो माझा आवडता पाकिस्तानी क्रिकेटपटू”