कोलकाता। भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात आक्रमक कर्णधार आणि धडाकेबाज खेळाडू म्हणून ओळखले जात होते. भारतीय संघात त्याचे वेगळे स्थान होते. त्याच्यापेक्षा लहान, मोठे सर्वजण त्याला ‘दादा’ या नावाने पुकारत असायचे. इतकेच नाही तर परदेशी खेळाडू तर आजही त्याला ‘दादा’ या नावाने पुकारतात.
इतर क्रिकेटपटूंप्रमाणे गांगुलीचाही विवादांशी नातं राहिलं आहे. यामध्ये त्याचा माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल (Greg Chappell) यांच्याशी झालेला विवाद सर्वप्रथम आठवतो. असे म्हटले जाते की या वादामुळेच गांगुलीला संघातून बाहेरचा रस्ता धरावा लागला होता. परंतु क्रिकेटला आपले सर्वकाही मानलेल्या गांगुलीने भारतीय संघात पुनरागमन तर केलेच, तसेच त्याने शानदार निरोप सामनाही खेळला. तो म्हणाला, की २००५ मध्ये राष्ट्रीय संघातून वगळल्यानंतर त्याचा आत्मिवश्वास आणखी वाढला होता.
एका मुलाखतीदरम्यान गांगुली (Sourav Ganguly) म्हणाला, “२००५ मध्ये झिंबाब्वे दौऱ्यावरून परतल्यानंतर भारतीय संघातून वगळल्यानंतर माझा आत्मविश्वास खचला नाही, तर तो आणखी वाढला होता. मला माहीत होते की मला पुन्हा खेळण्याची संधी मिळेल, तेव्हा मी पुन्हा एकदा धावा करेल. माझे प्रशिक्षक मैदानावर वेगवान गोलंदाज वसीम अक्रम (Wasim Akram), शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) यांच्याविरुद्ध फलंदाजी करत नव्हते. मी जात होतो आणि त्यांच्याविरुद्ध धावा काढण्यातही यशस्वी झालो. जर मी १० वर्षे असे करू शकतो, तर मला आणखी एकदा संधी मिळाली तर पुन्हा करू शकतो.”
“हे खरं आहे की संघातून वगळल्यानंतर मी खूप निराश झालो होतो. परंतु मी कधीही एका सेकंदासाठीही आत्मविश्वास गमावला नाही. मला यासाठी एकट्या ग्रेग चॅपेल यांना दोषी ठरवायचे नाही. परंतु त्यांनी याची सुरुवात केली होती, ही गोष्ट नाकारूनही चालणार नाही,” असेही चॅपेल यांच्याबद्दल बोलताना गांगुली म्हणाला.
“त्यांनी (चॅपेल) यांनी अचानक माझ्याविरुद्ध बोर्डाला एक ई-मेल केला होता, जो लिक झाला होता. असे का होते? क्रिकेट संघ हा एका कुटुंबाप्रमाणे आहे. कुटुंबात वैचारिक मतभेद आणि गैरसमज होऊ शकतात. परंतु त्यांना चर्चा करून दूर केले पाहिजे. चॅपेल प्रशिक्षक होते. जर त्यांना वाटत होते की मला एका पद्धतीने खेळले पाहिजे, तर माझ्याजवळ येऊन सांगितले पाहिजे होते. जेव्हा मी खेळाडू म्हणून संघात पुनरागमन केले, तेव्हा त्यांनी मला ती गोष्ट सांगितली, जी आधीच सांगायला हवी होती,” असेही तो पुढे म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-यूएईमध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांत परदेशी खेळाडूच ठरले होते किंग, फक्त एक भारतीय…
-टाईट सामना म्हणजे काय? या ३ कसोटी सामन्यांनी एक उदाहरण घालून दिले
-आयसीसीचं टेन्शन वाढलं, वर्ल्डकपच्या प्री बुक तिकीटांचं करायचं तरी काय?