भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पाकिस्तानमध्ये सार्वजनिक निवडणुकीत विजयी झालेल्या इम्रान खान यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या निवडणुकीसाठी बुधवारी (25 जुलै),रोजी पाकिस्तानमध्ये मतदान पार पडले होते. याचा निकाल गुरुवारी (26 जुलै) लागला. या निकालानुसार इम्रान यांच्या तेहरीक-ए-इन्सांफ पक्षाने 272 जांगापैकी 115 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे बहुमताच्या जवळ आलेल्या इम्रान खान यांचे पंतप्रधान पद नक्की आहे.
बंगालच्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभादरम्यान बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुलीने इम्रान खान यांना निवडणूक विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना गांगुली म्हणाला, ” इम्रान खानचे अभिनंदन. यासाठी ते बराच काळ लढत होते आणि आता ते पाकिस्तानचे पंतप्रधान बनणार आहेत.”
त्याचबरोबर1992 सालच्या विश्वविजेत्या पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधार इम्रान खान यांचे क्रिकेटसह सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे.
बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या पार पडलेल्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात दिप्ती शर्माला सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार तर इशान पोरेलला सर्वोत्तम 19 वर्षांखालील क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला आहे.
तसेच बंगालचे माजी गोलंदाज बरुन बर्मन यांना कार्तिक बोस जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी गांगुलीने अाता रणजी ट्रॉफीही जिंकू अशी आशा व्यक्त केली आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–हार्दिक पंड्याच्या कसोटी पदार्पणाला झाले एक वर्ष पूर्ण
–टीम इंडियाच्या या महिला क्रिकेटर्सने दिली यो यो टेस्ट
–दोन महिने आधीच बंगालने केला रणजी संघाचा कर्णधार घोषीत