आशिया खंडातील क्रिकेटचे सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा असलला आशिया चषक शनिवारपासून (२७ ऑगस्ट) सुरू होत आहे. गतविजेता भारतीय क्रिकेट संघ पहिल्याच सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडेल. हा बहुप्रतिक्षित सामना रविवारी (२८ ऑगस्ट) रोजी होईल. या महत्त्वाच्या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला आपला जुना फॉर्म मिळवतो की नाही, याकडेही सर्वांचे लक्ष असेल. कोहलीचा खराब फॉर्म हा सर्वाधिक चर्चेचा विषय असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज असलेला विराट कोहली अलीकडच्या काही महिन्यांपासून धावांसाठी झगडतोय. त्यामुळे भारताच्या टी२० संघातील त्याच्या स्थानावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, निवड समिती, बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन सातत्याने त्याच्यावर विश्वास दाखवतात. भारताचा माजी कर्णधार गांगुलीलाही कोहलीच्या फॉर्ममध्ये परतण्याचा विश्वास आहे. मात्र, त्याला स्वतःसाठी देखील धावा करायच्या आहेत, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
नुकतेच एका कार्यक्रमात गांगुली यांना कोहलीच्या फॉर्मबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले,
“त्याला केवळ संघासाठीच नाही तर स्वत:साठी धावा करण्याची गरज असून, त्याच्यासाठी हा हंगाम चांगला असेल अशी आशा आहे. तो पुन्हा फॉर्ममध्ये येईल यावर आम्हा सर्वांना विश्वास आहे.”
विराट कोहलीने नोव्हेंबर २०१९ पासून शतक झळकावले नाही. त्याच्या नावे आतापर्यंत ७० आंतरराष्ट्रीय शतके आहेत. विराट आशिया चषकात चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असून, सराव सत्रात तो आक्रमक फलंदाजी करताना दिसला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आयसीसीच्या ‘१००% सुपरस्टार’ यादीत स्म्रिती मंधानाचा समावेश, इतर चौघींची नावेही घ्या जाणून
मुंबईचे क्रीडापटू मयूर व्यास यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’च्या ‘लाइफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड्स’ ने गौरव