जागतिक कोसटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे चमकदार कामगिरी करू शकला. संघातील इतर सर्व फलंदाज अपयशी ठरत अशताना रहाणे एकटाच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करताना दिसला. याच पार्श्वभूमीवर त्याला पुन्हा एकदा भारताचे उपकर्णधारपद दिले गेले. मात्र, संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयाशी भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली सहमत दिसत नाही.
डब्ल्यूटीसीच्या (WTC) अंतिम सामन्यात अजिंक्य रहाणे (Sourav Ganguly) 89 आणइ 46 धावांची खेळी केली होती. त्याआधी तब्बल 18 महिने तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये रहाणेने चेन्नई सुपर किंग्जसाठी केलेल्या प्रदर्शनामुळे त्याला संघात पुनरागमनाची संधी मिळाली. या संघीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला आणि वेस्ट इंडीज दौऱ्यात पुन्हा कसोटी संघाचे उपकर्णधारपद मिळवले. रहाणेचे अचानक संघात पुनरागमन आणि लगेच उपकर्णधार बनण्यामुळे अनेकांना अश्चर्य वाटत आहेत. स्वतः सौरव गांगुली (Sourav Ganguly) देखील या गोष्टींचा विचार करत नव्हते.
माध्यमांशी बोलताना गांगुलीला एक प्रश्न विचारला गेला. उपकर्णधारपदाच्या जबाबदारीसाठी शुबमन गिल एक आदर्श शुबमन गिल सारख्या एखाद्या खेळाडूचा विचार केला पाहिजे होता का? असा प्रश्न त्याला विचारला गेला. गांगुलीने उत्तर दिले, “होय मलाही असेच वाटते.” गांगुलींच्या मते रहाणेला उफकर्णधार बनवण्याचा निर्णय संघासाठी तोट्याचा नाही, पण व्यावहारिक देखी वाटत नाही.
संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर गांगुली म्हणाला, “संघाने उलट्या दिशेने पाऊल टाकले, असे मी म्हणत नाहीये. पण तुम्ही 18 महिने संघातून बाहेऱ आहात, मग एक कसोटी खेळता आणि तुम्हाला उपकर्णधार बनवले जाते. मला यामागची विचार समजला नाही. रविंद्र जडेजाही मोठ्या काळापासून संघात आहे आणि कसोटी सामन्यात नक्कीच खेळतो. उपकर्णधारपदासाठी तोदेखील एक पर्याय होता.”
“मला असेच म्हणायचे आहे की, निवड प्रक्रियेत स्थिरता असली पाहिजे. भारतीय निवडकर्त्यांनी चेतेश्वर पुजारासारख्या मोठ्या खेळाडूला बाहेर बसवून बदल करायला सुरुवात केलीये. निवडकर्त्यांनी त्याच्याविषयीची भूमिका स्पष्ट केली पाहिजे होती. कसोटी संघात त्याला खेळवयचे आहे किंवा युवा खेळाडूंसोबत पुढे जाणार आहेत, हे सांगितले पाहिजे होते. पुजारासाऱक्या खेळाडूला संघात घेणे- काढणे योग्य नाहीये. अजिंक्य रहाणेसोबतही असेच आहे,” असे गांगुली पुढे म्हणाला. (Sourav Ganguly surprised by Ajinkya Rahane being made vice-captain again)
महत्वाच्या बातम्या –
वनडे विश्वचषकासाठी बीसीसीआय एका झटक्यात खर्च करणार 500 कोटी! वाचा बोर्ड नेमकं काय करणार?
भारतीय संघात शिखर धवनचे 9 महिन्यांनी पुनरागमन! मिळणार थेट कर्णधारपदाची जबाबदारी