सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा फलंदाज जो रुट याने शतक झळकावले आहे. मात्र, त्याने शतक झळकावून कसोटी क्रिकेटमध्ये १०हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. असे लक्ष्य साध्य करणारा रुट जगातील १४वा खेळाडू ठरला आहे. रुटच्या या विक्रमी खळीने साक्षात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीला भुरळ पाडली आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने रविवारी लॉर्ड्सवर शतक झळकावले. रुटने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत नाबाद ११५ धावांची खेळी करत आपल्या संघाला नेत्रदीपक विजय मिळवून दिला, तर कसोटी क्रिकेटमध्ये १०हजार धावा पूर्ण करताना, ही कामगिरी करणारा तो जगातील १४वा खेळाडू ठरला. त्याच्या या खेळीनंतर सौरव गांगुलीने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून रुटला शुभेच्छा देत “जो रूट. काय खेळाडू आहे, दबावात काय खेळी केलीय. सार्वकालिन सर्वोत्तम.”, अशी पदवी दिली आहे.
Joe Roooooooot ..what a player what a knock under pressure ..an all time great ..@bcci @icc
— Sourav Ganguly (@SGanguly99) June 5, 2022
रुटच्या कसोटी कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत ११८ कसोटी सामन्यांतील २१८ डावात फलंदाजी करताना ४९.५७च्या सरासरीने १००१५ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने २६ शतके आणि ५३ अर्धशतकेही झळकावली आहेत. या धावा करताना २५४ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे.
त्यानंतर कसोटी क्रिकेटला वरच्या स्थानावर ठेवण्याबाबत तो म्हणाला की, “तुम्ही कोणताही फॉरमॅट पाहा… तुम्ही कोणत्याही रंगाची जर्सी घाला, कसोटी क्रिकेटची तुलना होऊच शकत नाही. चला हा फॉरमॅट वरती ठेवूया.” यावेळी त्याने बीसीसीआय आणि आयसीसीला आवाहन केले आहे.
Whatever format u see..whatever the colour of the jersey u wear ..none beats such a game of test cricket ..no comparison@bcci @ICC ..let's keep this format the pinnacle ..
— Sourav Ganguly (@SGanguly99) June 5, 2022
दरम्यान, सौरव गांगुलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत ११३ सामने खेळले. ज्यामध्ये त्याने ७२१२ धावा केल्या आहेत. या काळात त्याने १६ शतके आणि ३६ अर्धशतकेही झळकावली. विशेष बाब म्हणजे गांगुलीने लॉर्ड्सवर पदार्पणातच शानदार शतक झळकावले होते. त्याने २० जून १९९६ रोजी १३१ धावांची शानदार खेळी खेळली होती. गांगुलीच्या अनेक आठवणी लॉर्ड्सशी जोडलेल्या आहेत. त्याने १३ जुलै, २००२ रोजी लॉर्ड्सच्या बाल्कनीतून टी-शर्ट काढून नॅटवेस्ट मालिकेचा विजय साजरा केला होता.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तुझ्या दुधी भोपळ्याची साईजही तुझ्या…’, म्हणत विश्वविजेत्या भारतीय खेळाडूने उडवली चहलची खिल्ली
Video: खेळपट्टीवर पाऊल ठेवताच पठ्ठ्याने पाडला धावांचा पाऊस, अवघ्या ३३ चेंडूत ठोकल्या ९१ धावा
‘मी मुद्दाम सचिनला मारण्याच्या हेतूने धोकादायक गोलंदाजी करत होतो’, १६ वर्षांनंतर अख्तरचा मोठा खुलासा