---Advertisement---

कोहलीच्या खराब फॉर्मबाबत सौरव गांगुलींचे मोठे विधान! म्हणाले, ‘त्याला फक्त…’

On: मंगळवार, ऑगस्ट 16, 2022 12:17 PM
Virat-Kohli-and-Sourav-Ganguly
---Advertisement---

विराट कोहली गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंडच्या संपूर्ण दौऱ्यात त्याला केवळ १०० धावा करता आल्या. यानंतर त्याने वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकाद्वारे कोहली आता मैदानात परतणार आहे. आशिया कप कोहली आणि टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण टी-२० विश्वचषक यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे.

दरम्यान, कोहलीच्या खराब फॉर्मबद्दल बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला की, “त्याला सराव करू द्या, त्याला सामने खेळू द्या, तो मोठा खेळाडू आहे आणि त्याने यापूर्वी खूप धावा केल्या आहेत. मला आशा आहे की तो लवकरच परत येईल. त्याला शतक झळकावता आलेले नाही आणि मला खात्री आहे की आशिया चषकात तो नक्कीच आपली लय शोधेल.”

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

दु:खद! बीसीसीआयच्या माजी सदस्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, झारखंडशी होते कनेक्शन

‘खेळूद्या की त्याला’, आशिया चषकापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीचे विराटबद्दल मोठे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---