भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीला विश्वास आहे की युवराज सिंग नक्कीच भारतीय संघात पुनरागमन करेल. युवराज सिंगच्या प्रतिभेवर अजूनही गांगुलीला विश्वास आहे आणि चांगला खेळ केला तर तो नक्कीच भारतीय संघात परत येईल असे त्याला वाटते.
युवराजला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत संघात स्थान देण्यात आले नाही. याआधी झालेल्या भारताच्या श्रीलंका दौऱ्यातही त्याला संधी देण्यात आली नव्हती. याबद्दल बोलताना हा माजी कर्णधार म्हणाला, ” युवराजने संघर्ष केला तर तो संघात नक्कीच परत येऊ शकतो. सर्व काही संपलेले नाही.”
२०१९ विश्वचषकाच्या संघ निवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या रोटेशन पोलीसीबद्दल बोलताना गांगुली म्हणाला,” निवड समितीला तरुणांना संधी द्याची आहे. २०१९ विश्वचषकाचा विचार करता आतापासूनच तयारी करणे गरजेचे आहे. आपल्याकडे अजून बराच वेळ आहे आणि सर्वांना संधी मिळणार याबद्दल शंका नाही.”
एकेकाळचा “मॅच विनर” असलेल्या युवराजला आता संघात स्थान मिळवणे अवघड झाले आहे. आता २०१९च्या विश्वचषका आधी जर युवराजला पुरेशी संधी देण्यात आली नाही तर तो त्याच्यासाठी एक क्लिअर मेसेज असेल.