इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) दिल्ली कॅपिटल्सचे नवे संचालक सौरव गांगुली यांनी रिषभ पंत (Rishabh Pant) याच्याबाबत मोठी अपडेट दिली आहे. त्यांनी सांगितले की कार अपघातात गंभीर जखमी झालेला पंत 2023च्या आयपीएल हंगामात खेळू शकणार नाही. त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी आणि व्यवसायिक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी अधिक काळ लागणार आहे.
सौरव गांगुली (Sourav Ganguly) माध्यमांशी बोलताना म्हटले, “पंत आयपीएलमध्ये खेळणार नाही. तो संघात नसल्याने त्याचा परिणाम तर होणारच आहे, मात्र आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहोत.”
पंतला घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी20 मालिकेतून वगळले होते. तो बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्ये जाणार होता. त्याआधी तो त्याच्या कुंटुबाला सरप्राईज भेट देण्यासाठी दिल्लीहून रुरकीकडे जात होता. 30 डिसेंबर, 2022ला पहाटे दिल्ली-डेहराडून महामार्गावर त्याचा भीषण अपघात झाला. त्याची गाडी डिवायडरला धकडून दुसऱ्या बाजूला गेली. यामध्ये त्याची गाडी जळून खाक झाली, तर त्याला डोके, पाय आणि पाठीला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर पंतला स्थानिक लोकांनी डेहराडुनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथे त्याच्या पाठीवर प्लास्टिक सर्जरी झाली असून तेव्हा त्याच्या मेंदू आणि मणक्याचे स्कॅनही केले गेले. त्याचे रिपोर्ट्स आल्यावर त्याला कोणचीही गंभीर दुखापत झाली नाही, हे कळाले. त्याच्या गुडघ्यालाही मोठी दुखापत झाली. त्यासाठी त्याला मुंबईत हलवण्यात आले. जेथे त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. त्याच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मेडिकल पथकही लक्ष ठेवून आहे.
पंत हा भारताचा कसोटीतील उत्तम विकेटकीपर तर आहेच, त्याच्यासोबत तो एक जबरदस्त फलंदाजही आहे. त्याने अनेक सामन्यात महत्वाची खेळी करत संघाच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडली आहे. त्यातच अपघातात गुडघ्याची दुखापत होणे हे एका खेळाडूसाठी धोक्याचे असते, त्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी अधिक काळ लागेल, ही शक्यता दृष्टीआड करून चालणार नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट संघासाठीच खेळतो! किंग कोहलीच्या 45 पैकी ‘इतक्या’ वनडे शतकांमुळे जिंकलाय भारत, तर सचिनमुळे…
लायन शंतनु सिध्दा यांच्या स्मरणार्थ लायन्स प्रौढ टी-20 क्रिकेट स्पर्धेत गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक संघांची विजयी सलामी