---Advertisement---

“मी आयुष्यभर लक्षात ठेवेल”, गांगुलीने आपल्या खास मित्राप्रती व्यक्त केली कृतज्ञता

On: गुरूवार, जानेवारी 7, 2021 2:44 PM
---Advertisement---

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना वुडलँड्स हॉस्पिटलमधून गुरुवारी(7 जानेवारी) घरी सोडण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा झटका आल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यानंतर आता त्यांना घरी सोडले आहे. घरी आल्यानंतर सौरव गांगुलीने सोशल मीडियावर आपल्या एका मित्राचा फोटो शेअर करून त्याचे आभार मानले आहेत.

सौरव गांगुलीने इंस्टाग्रामवर लिहले आहे की, “मागील पाच दिवसात माझ्यासाठी जे केले आहे, जे काही असे आहे, ज्याला मी आयुष्यभर लक्षात ठेवेल. तुला 40 वर्षापासून ओळखतो आणि हे कुटुंबापेक्षा जास्त आहे.”

सौरव गांगुली यांचा बालपणीचा मित्र जाॅयदीप सध्या बंगाल क्रिकेट संघटनेचे डायरेक्टर आहेत आणि ते समालोचन सुद्धा करतात.

https://www.instagram.com/p/CJu46swl_Vb/

गांगुलीने हॉस्पिटलचेही मानले आभार –

हॉस्पिटलमधून घरी सोडल्यानंतर सौरव गांगुलीने वुडलँड्स हॉस्पिटलच्या उपचार करणार्‍या मेडिकल पथकाचे आणि गरजेच्या प्रक्रिया करण्यासाठी आभार मानले. सौरव गांगुली पत्रकारांना म्हणाले, “मी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे आभार मानतो. मी पूर्णपणे व्यवस्थित आहे. आशा आहे, मी लवकरच उड्डाण घेण्यासाठी तयार होईल.”

हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, सौरव गांगुली यांच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष दिले जाईल आणि वेळोवेळी योग्य पाऊल उचलले जाईल. तत्पूर्वी भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना बुधवारी घरी सोडण्यात येणार होते. मात्र त्यांनी हॉस्पिटलमध्ये अजून एक दिवस थांबण्याचा निर्णय घेतला होता.

वुडलँड्स हॉस्पिटलच्या सीईओ आणि एमडी डॉ. रुपाली बासू म्हणाल्या, भारतीय माजी कर्णधार सौरव गांगुली यांना घरी सोडल्यानंतर ही त्यांच्या आरोग्यावर दैनंदिन लक्ष ठेवले जाईल. त्याचबरोबर डॉ. रुपाली बासू पत्रकारांसोबत बोलताना म्हणाल्या, “आम्हाला या गोष्टीचा आनंद आणि गर्व आहे की, सौरव गांगुलीने आमच्यावर विश्वास दाखवला. त्याचबरोबर आम्ही त्या विश्वासास पात्र ठरलो.”

महत्त्वाच्या बातम्या –

दहा मिनिटात दोन झेल सोडल्याने रिषभ पंतवर चाहत्यांची आगपाखड, मीम्स व्हायरल

स्मिथची तयारी जोरात! हॉटेलरुममध्ये चक्क जर्सी घालून करतोय फलंदाजीचा सराव

“स्टीव्ह स्मिथ पिंजर्‍यातील वाघ आहे, तो केव्हा ही हल्ला करू शकतो”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---