मुंबई । भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगलीने प्रतिभावान खेळाडू विजय शंकरच्या विश्वचषक वारीबद्दल नकारात्मक सुर आवळला आहे. मला विजय शंकर विश्वचषकात न खेळण्याची शक्यता जास्त वाटते असे गांगुली म्हटला आहे.
काही दिवसांपुर्वीच निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी विजय शंकर, रिषभ पंत आणि अजिंक्य रहाणेच्या विश्वचषकातील समावेशाबद्दल भाष्य केले होते. परंतु गांगुलीने केलेल्या या भविष्यवाणीची सध्या जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे गांगुलीने यासाठी कोणतेही कारण दिले नाही.
“विजय शंकरने त्याच्या फलंदाजीत अनेक सुधारणा केल्या आहेत. तसेच रिषभ पंत देखील चांगला खेळत आहे. तरीही मला वाटते की विजय शंकर विश्वचषकासाठी संघासोबत जाोण्याची शक्यता खूपच कमी आहे.” असे गांगुलीने म्हटले आहे.
विजय शंकरने भारताकडून ४ वनडे आणि ८ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने एकूण १४६ धावा आणि ३ विकेट्स अशी कामगिरी केली आहे.
सौरव गांगुलीच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघ २००३मध्ये विश्वचषकाच्या अंतिम फेरीत १९८३नंतर केवळ दुसऱ्यांदाच पोहचला होता.
२०१९चा आयसीसी विश्वचषक ३०मे ते १४ जूलै रोजी इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे. यासाठी संघांमधील १५ खेळाडूंची अंतिम यादी पाठविण्याची तारिख २० एप्रिल आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियाकडून विश्वचषकात सतत पराभूत होणारा पाकिस्तान यावेळी करणार हिशोब चुकता?
–या दिवशी होणार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
–संपुर्ण यादी- शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा, स्मृती मानधनासह या खेळाडूंना मिळणार पुरस्कार
–हिटमॅन रोहित शर्माबरोबर रिषभ पंतने विश्वचषकात सलामीला यावे
–भारताच्या सुरेश रैनासह हे ४ आहेत जाॅंटी रोड्सचे आवडते क्षेत्ररक्षक