आगामी टी20 विश्वचषकाची (t20 world cup) सुरुवात येत्या 2 जूनपासून होणार आहे. टी20 विश्वचषकात एकूण 20 संघांनी सहभाग नोंदवला आहे. टी20 विश्वचषकाचा हा 9 वा हंगाम आहे. भारताने आतापर्यंत फक्त धोनी कर्णधार असताना 2007 साली टी20 विश्वचषक जिंकला होता. तत्पूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा या टी20 विश्वचषकानंतर प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. राहुल द्रविड भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी पुन्हा इच्छुक नाहीत, असे त्यांनी सांगितले आहे.
परंतु मागील काही दिवसांपासून चाहत्यांच्या चर्चा सुरु आहेत, की भारतीय संघाचा पुढचा मुख्य प्रशिक्षक कोण होणार? मीडिया रिपोर्ट्सनुसार भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीर जास्त चर्चेत आहे. तत्पूर्वी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं सोशल मीडिया ‘X’ या प्लॅटफाॅर्मवर केलेल्या ट्वीटनं चर्चांना उधाण आलं आहे. गांगुलीनं या ट्वीटद्वारे सांगितलं आहे की, एखाद्या खेळाडूच्या आयुष्यात प्रशिक्षकाची भूमिका काय असते. सौरव गांगुलीनं या ट्वीटमध्ये भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाविषयी काही उल्लेख केला नाही. परंतु म्हंटले जात आहे की, गांगुलीनं गौतम गंभीरला इशारा दिला आहे.
सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर लिहलं की, “एखाद्याच्या आयुष्यात प्रशिक्षकाचे महत्त्व हे कोणत्याही व्यक्तीचे भविष्य घडवते. ते मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर. त्यामुळे प्रशिक्षकाची योग्य निवड करा.” सौरव गांगुलीला माहीत आहे की, भारतीय संघाच्या प्रशिक्षकाला कोणत्या अडचणी येऊ शकतात.
सौरव गांगुली बीसीसीआयच्या (BCCI) अनेक पदावर होता. त्यामध्ये तो बीसीसीआय अध्यक्ष्यसुद्धा राहिला आहे. परंतु तो भारतीय संघाचा प्रशिक्षक राहिला नाही. गांगुली आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. त्यामुळे सौरव गांगुलीला प्रशिक्षक पदाचा अनुभव आहे. आयपीएल 2011 च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा कर्णधार सौरव गांगुली होता. परंतु केकेआरनं गांगुलीच्या जागी गौतम गंभीरला (Gautam Gambhir) कर्णधारपद दिलं होत.
सौरव गांगुली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये वाद आहेत, हे आतापर्यंत कुठे स्पष्ट झालं नाही. परंतु गांगुलीच एक्सवरील ट्वीट हे बीसीसीआयनं गौतम गंभीरला भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्याच्या विरोधात होते. अशा चर्चांना उधाण आलं आहे. गौतम गंभीर हा शिस्तबद्ध खेळाडू आहे. त्याच्या चेहऱ्यावर हास्य हे फक्त कधीतरीच पाहायला मिळतं. जर बीसीसीआयनं गौतम गंभीरची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली तर, गंभीरच्या भारतीय वरीष्ठ खेळाडूंबाबत काय प्रतिक्रिया असतील हे देखण्याजोगं राहणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“कंपालाच्या झोपडपट्टी पासून ते टी 20 विश्वचषक” युगांडा खेळाडूंनी घेतली गगन भरारी
पाकिस्तानचा 7 विकेट्सनं दारुण पराभव, इंग्लंडनं टी20 मालिकेवर गाजवले वर्चस्व
‘आता नाही तर कधीच नाही’ या तीन भारतीय खेळाडूंना टी20 विश्वचषक जिंकण्याची शेवटची संधी!