---Advertisement---

…म्हणून सौरव गांगुलीने घातले तब्बल १९ वर्षांपूर्वीचे ‘ते’ खास ब्लेझर

On: बुधवार, ऑक्टोबर 23, 2019 6:06 PM
---Advertisement---

भारताचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदी आज(23 ऑक्टोबर) अधिकृतरित्या नियुक्त करण्यात आले आहे. तो बीसीसीआयचा 39 वा अध्यक्ष बनला आहे.

गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारताना एक खास ब्लेझर घातले होते. हे ब्लेझर त्याला तो भारताचा कर्णधार झाल्यानंतर मिळाले होते. गांगुलीने 2000मध्ये भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकारली होती.

त्याच्या या ब्लेझरबद्दल बीसीसीआय अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर गांगुली म्हणाला, ‘मला हे ब्लेझर मी जेव्हा भारताचा कर्णधार होतो तेव्हा मिळाले होते. त्यामुळे मी हे घालण्याचा निर्णय घेतला. पण मला हे इतके सैल आहे हे कळाले नव्हते. मला हे ब्लेझर मी कर्णधार झाल्यानंतर मिळाले होते.’

तसेच भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 195 सामन्यांमध्ये नेतृत्व केलेला गांगुली म्हणाला, ‘मी आता माझ्याप्रमाणे काम करणार आहे. मी कोणतीही तडजोड न करता विश्वासार्ह्यतेने, भ्रष्टाचारमुक्त आणि बीसीसीआयमधील सर्वांसाठी समान काम करेल. याचप्रकारे मी भारताचे नेतृत्व केले होते आणि आता मी संघटनेलाही अशाच प्रकारे पुढे नेईल.’

गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ जुलै 2020 पर्यंत असणार आहे. त्यानंतर त्याला कुलिंग ऑफ पिरियड(विश्रांती) घेणे अनिवार्य असेल.

बीसीसीयच्या नियमानुसार कोणत्याही पदापवर 6 वर्षे झाल्यानंतर त्या व्यक्तीला कूलिंग ऑफ पिरियड(विश्रांती) अनिवार्य आहे. गांगुली याआधी मागील 5 वर्षे बंगाल क्रिकेट असोसिएशनमध्ये पदाधिकारी होता. त्यामुळे त्याला 9 महिने बीसीसीआय अध्यक्षपद सांभाळल्यानंतर कुलिंग ऑफ पिरियड घ्यावा लागेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---