भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष म्हणून सौरव गांगुली यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. नवीन नियमानुसार त्यांना दुसरी टर्म मिळणे शक्य होते. परंतु, राज्य संघटनांचा पाठिंबा न मिळाल्याने ती शक्यता मावळली आहे. भारताचे माजी अष्टपैलू रॉजर बिन्नी बीसीसीआयचे अध्यक्ष होतील. त्यानंतर आता सौरव गांगुली यांच्या खांद्यावर पुन्हा एकदा नवीन जबाबदारी येण्याची शक्यता वाढली आहे.
गांगुली यांना आणखी एक टर्म बीसीसीआय अध्यक्षपद हवे होते. मात्र, इतरांचा त्यांना पाठिंबा नव्हता. तसेच या बदल्यात त्यांना आयपीएल चेअरमन पदाची ऑफर देण्यात आली होती. परंतु, ज्या संस्थेचे सर्वोच्च पद भूषवले आहे, त्या संस्थेच्या दुय्यम समितीत काम करण्यास त्यांनी नकार दिला. तसेच जागतिक क्रिकेट परिषदेतही भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या नावाचा विचार केला गेला नाही.
या सर्व घडामोडीनंतर गांगुली हे पुन्हा एकदा क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. पत्रकारांशी बोलताना स्वतः गांगुली यांनी याबाबतचे सुतोवाच केले. ते म्हणाले,
“सीएबीच्या अध्यक्षपदाची पुढील निवडणूक मी लढवेल” सीएबीचे विद्यमान अध्यक्ष अविषेक दालमिया यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीएबीचे पॅनल 20 ऑक्टोबर रोजी घोषित केले जाईल. त्यानंतर, 22 ऑक्टोबर रोजी गांगुली हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.
गांगुली यांनी यापूर्वी देखील सीएबीचे अध्यक्षपद भूषवले होते. जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर त्यांनी ही जबाबदारी सांभाळलेली. 2019 मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष होईपर्यंत ते या पदावर कार्यरत होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
जरा इकडं पाहा! पाकिस्तानी पठ्ठ्यासोबत परदेशी चाहतीला करायचंय लग्न, क्रिकेटपटूवर लागलेत गंभीर आरोप
हे काय होतं! जेमिमाचे सेलिब्रेशन पाहून तुम्हीही असंच म्हणाल; भन्नाट व्हिडिओ व्हायरल