कोलकता क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष आणि भारताचा माजी महान कर्णधार सौरव गांगुली हा एक दिवस बंगालचा मुख्यमंत्री बनू शकतो, असे भाकीत वर्तवले आहेे ते भारताचा धडाकेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवागने.
सेहवागची काराकिर्द घडवण्यामध्ये गांगुलीचे खूप मोठे योगदान होते. गांगुलीच्या नेतृत्वाखाली सेहवागची काराकिर्द चांगलीच बहरली होती. त्यामुळे सेहवाग गांगुलीच्या नेतृत्व गुणांना खूप चांगला ओळखतो.
यामुळेच गांगुलीच्या ‘अ सेन्चुरी इज नॉट इनफ’ या आत्मचरित्राच्या अनावरण कार्यक्रमात सेहवाग म्हणाला, “गांगुली एक दिवस 100 टक्के बंगालचा मुख्यमंत्री बनेल. पण त्याआधी तो बीसीसीआयचा अध्यक्ष बनेल.”
क्रिकेटपटूंनी राजकारणात जाणे काही नवीन नाही. याआधीही नवज्योतसिंग सिद्धू, इम्रान खान, सनथ जयसुर्या, कीर्ती आजाद हे क्रिकेटपटू राजकारणात आहेत.
गांगुलीच्या ‘अ सेन्चुरी इज नॉट इनफ’ या आत्मचरित्राच्या अनावरण कार्यक्रमात युवराज सिंगही उपस्थित होता. या कार्यक्रमात त्यांनी अनेक गमतीशीर किस्सेही सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
–क्रिकेटर जेव्हा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ग्लोव्हजमध्ये ठेवतो स्क्वॅशचा चेंडू…
–आज चुकीला माफी नाही, पराभूत संघासाठी पुढचा प्रवास खडतर
–आमदार चषक कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियमला अजिंक्यपद
–धोनीचा हा विक्रम फक्त विराटच मोडू शकतो!
–मला त्यांनी साधा फोनही केला नाही याचे जास्त वाईट वाटले- ख्रिस गेल