इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीचे प्रदर्शन खूपच सुमार पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे संघ व्यवस्थापन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहे. मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आगामी हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडतील, असे सांगितले जात आहे. सौरव गांगुली यांचे नावे दिल्लीचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून चर्चेत आहे.
रिकी पाँटिंग (Ricky Ponting) आयपीएल 2018 मध्ये पहिल्यांदा दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक बनले होते. त्यानंतर मागच्या सहा आयपीएल हंगामांमध्ये त्यांच्याच मार्गदर्शनात दिल्ली कॅपिटल्स संघ खेळला आहे. तर दुसरीकडे सौरव गांगुली (Sourav Ganguly) देखील मागच्या दोन वर्षांपासून दिल्ली कॅपिटल्सच्या डायरेक्टरची भूमिका पार पाडत आहे. यापूर्वी आयपीएल 2019 मध्ये गांगुलींनी दिल्लीच्या मेंटॉरचीही भूमिका पार पाडल आहे. 2019 मध्ये गांगुली संघाचे मेंटॉर असताना दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर होता आणि संघ त्यावेली क्लॉविफायर दोनपर्यंत पोहोचला होता.
माध्यमांतील वृत्तांनुसार मागच्या वर्षी डेविड वॉर्नरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने केलेल्या सुमार प्रदर्शनानंतर रिकी पाँटिंग संघाची साथ सोडणार आहेत. संघाचे मुख्य प्रशिक्षकपद आगामी आयपीएल हंगामात सौरव गांगुलींच्या हातात दिले जाणार आहे. बंगाली वृत्तपत्र ‘सांगबाद प्रतिदिन’ने याविषयी सविस्तर वृत्त दिले आहे. वृत्तानुसार गांगुली आयपीएल 2023मध्ये दिल्लीच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडू शकतात. तर दुसरीकडे पाँटिंगने संघाची साथ सोडण्याचे ठरवले आहे. माध्यामांतील या वृत्तांनंतर सोशल मीडियावर देखील याविषयी जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
असे असले तरी, फ्रँचायझी, पाँटिंग किंवा गांगुलींकडून याविषयी कुठलीही अधिकृत माहिती मिळाली नाहीये. येत्या काळात संघ याविषयी काय निर्णय घेणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (Sourav Ganguly will replace Ricky Ponting as the head coach of Delhi Capitals, according to media reports.)
महत्वाच्या बातम्या –
IND vs AUS : रोहितसेनेवर बरसले रवी शास्त्री; म्हणाले, ‘आयपीएल देशापेक्षा मोठी नाही…’
अजिंक्यच्या ‘फायटिंग इनिंग’नंतर पत्नी राधिकाची भावनिक पोस्ट, म्हणाली, “मला अभिमान वाटतो”