दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केलेल्या अष्टपैलू फरहान बेहारडीन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने ही माहिती दिली.
फरहान बेहारडीन हा एबी डिव्हिलियर्स, फाफ डू प्लेसिस व डेल स्टेन यांसारखे दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज संघात असताना संघाचा भाग होता. तसेच त्याला काही सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी मिळालेली. मात्र, मागील चार वर्षापासून त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळाले नव्हते. त्याने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2018 मध्ये खेळलेला.
https://twitter.com/TheYorkerBall/status/1607639703947456512?t=oJ9N6BwUO068mlxIacY-qg&s=19
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या आपल्या निवृत्तीच्या पत्रामध्ये त्याने लिहिले,
‘काही गोष्टी आता संपलेल्या आहेत. मागील आठवड्यापासून मी काहीसा भावूक झालेलो. अठरा वर्ष अशी आली आणि गेली. क्रिकेटच्या सगळ्या प्रकारात मिळून मी 560 व्यावसायिक सामने खेळले. 97 आंतरराष्ट्रीय सामन्यांत मी सहभागी झालो. 17 विजेतेपदे आणि चार विश्वचषकांचा मी भाग राहीलो. 18 वर्ष मी फक्त या खेळावर प्रेम करत आलो. आता नव्या आव्हानासाठी तयार आहे.’
सध्या 39 वर्षांचा असलेला बेहारडीन हा या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत प्रथमश्रेणी क्रिकेट खेळत होता.
फरहानने 30 मार्च 2012 रोजी जोहान्सबर्ग येथे भारताविरुद्ध टी20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले. जानेवारी 2013 मध्ये, त्याने न्यूझीलंडविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो दक्षिण आफ्रिकेकडून दोन टी20 आणि दोन वनडे विश्वचषक खेळला. दक्षिण आफ्रिकेकडून खेळलेल्या 59 वनडे सामन्यांमध्ये या खेळाडूने सहा अर्धशतके झळकावताना 30.68 च्या सरासरीने 1074 धावा केल्या आहेत. तर 38 टी20 सामन्यांमध्ये या फलंदाजाने 32.37 च्या सरासरीने 518 धावा केल्या. ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. तो दक्षिण आफ्रिकेकडून एकही कसोटी सामना खेळू शकला नाही.
(South Africa Allrounder Farhan Behardien Announced Retirement From International Cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅमेरून ग्रीन दुखापतीमुळे 5 महिने क्रिकेटपासून दूर? मुंबईचे 17 कोटी पाण्यात
मोठी बातमी: कसोटी आणि वनडे क्रिकेटसाठी विराट टी20 मधून घेणार ब्रेक?






