क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेटने आगामी टी20 लीगच्या पहिल्या हंगामाची घोषणा केली आहे. या स्पर्धेत 33 सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेचे ऐतिहासिक मैदान ‘द वंडरर्स’ जोहान्सबर्ग येथे खेळले जाईल. दक्षिण आफ्रिकेत पुन्हा एकदा सुरू होत असलेल्या या प्रीमिअर टी20 लीगचा पहिला हंगाम देशातील सहा वेगळ्या ठिकाणी खेळला जाईल.
या स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व संघांचे मालकी हक्क इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेतील फ्रँचायझींपैकी सहा फ्रँचायझींकडे आहे. फक्त या संघांचे मालकी हक्कच नाही, तर या स्पर्धेचे स्वरूपही आयपीएलसारखेच आहे. या स्पर्धेत संघ साखळी फेरीत आपल्या 5 विरोधी संघांशी दोन वेळा भिडतात. एकदा घरच्या मैदानावर आणि दुसऱ्यांदा बाहेरच्या मैदानावर
The day everyone has been waiting for has arrived‼️#SA20 to blast off with an exciting Western Cape derby between @MICapeTown and @paarlroyals at Newlands 😁
Check out the FULL fixture list 👀 https://t.co/RoV0rOdK7t pic.twitter.com/XLFSHQPpXK
— Betway SA20 (@SA20_League) November 8, 2022
आयपीएलच्या सहा फ्रँचायझींनी विकत घेतले संघ
खरं तर, आयपीएलच्या सहा फ्रँचायझींनी दक्षिण आफ्रिकेच्या टी20 स्पर्धेत खेळणारे संघ विकत घेतले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सने एमआय केपटाऊन, चेन्नई सुपर किंग्सने जोबर्ग सुपरकिंग्स, राजस्थान रॉयल्सने पर्ल रॉयल्स, सनरायझर्स हैदराबादने सनरायझर्स इस्टर्न केप, दिल्ली कॅपिटल्सने प्रिटोरिया कॅपिटल्स आणि लखनऊ सुपरजायंट्सने डर्बन सुपरजायंट्स संघ विकत घेतला आहे. या स्पर्धेची सुरुवात 10 जानेवारी रोजी होईल, तर यास्पर्धेचा अंतिम सामना 11 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. या स्पर्धेदरम्यान एक आठवड्याचा ब्रेकही असेल. यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये 3 वनडे सामन्यांचे आयोजन होईल.
Are you ready for the #SA20?
Let us know which grass bank you're finding yourself on this summer 👇 pic.twitter.com/icIpkF82UD
— Betway SA20 (@SA20_League) November 8, 2022
दक्षिण आफ्रिका 20 (SA20) लीगच्या पहिल्या हंगामाच्या वेळापत्रकाची घोषणा केल्यानंतर लीगचे कमिश्नर (आयुक्त) आणि दक्षिण आफ्रिका संघाचे माजी कर्णधार ग्रीम स्मिथ यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले की, “SA20च्या पहिल्या हंगामासाठी वेळापत्रक जाहीर करणे ही आपल्या सर्वांसाठी मोठी गोष्ट आहे. हे सर्व इतके वास्तविक होत आहे, आम्ही निश्चितपणे जगातील सर्वोत्तम सामने पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. 10 जानेवारी रोजी एमआय केपटाऊन आणि पर्ल रॉयल्स यांच्यात पहिला सामना खेळवला जाईल. वंडरर्स मैदानाने गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक संस्मरणीय अंतिम सामने पाहिले आहेत. पहिल्या SA20 चॅम्पियन्सला ट्रॉफी उचलताना पाहण्यासाठी संपूर्ण स्टेडियम भरून जाईल, अशी आमची अपेक्षा आहे.”
दक्षिण आफ्रिकेतील या पहिल्या वहिल्या टी20 लीगच्या हंगामाला सुरुवात झाल्यानंतर या स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (south africa announces sa20 league fixtures know more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: युरोपियन क्रिकेटमध्ये गोलंदाजाने केल्या दोन मोठ्या चुका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘कोंबडी पकड’
मागच्या हंगामात दिल्लीने ‘या’ खेळाडूंना बनवले करोडपती, पण पठ्ठ्यांनी दीड दमडीचीही केली नाही कामगिरी