---Advertisement---

एका चीअरलीडरच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाला होता क्विंटन डी कॉक! खूपच फिल्मी आहे लव्ह स्टोरी

On: शनिवार, जून 22, 2024 2:11 PM
---Advertisement---

2024 टी20 विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. संघानं सुपर 8 मध्ये आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीच्या दिशेनं कूच केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या शानदार कामगिरीमागे यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याचा मोठा हात आहे. त्यानं सुपर 8 मध्ये प्रथम अमेरिकेविरुद्ध 74 आणि नंतर इंग्लंडविरुद्ध 65 धावा ठोकल्या.

क्विंटन डी कॉकच्या या चमकदार कामगिरीनंतर त्याची पत्नी चर्चेत आली आहे. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला दक्षिण आफ्रिकेच्या या सलामी फलंदाजाची प्रेमकहाणी सांगणार आहोत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, डी कॉकची प्रेमकहानी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही.

क्विंटन डी कॉकची पत्नी साशा हर्ले ही एक प्रसिद्ध चीअरलीडर आहे. याशिवाय साशानं क्रीडा पत्रकारितेचंही शिक्षण घेतलं आहे. साशा आणि डी कॉकच्या भेटीची कहाणी खूपच खास आहे. डी कॉक साशाला चॅम्पियन्स लीग 2012 मध्ये मुंबई इंडियन्स आणि हायवेल्ड लायन्स यांच्यातील सामन्यात पहिल्यांदा भेटला होता. त्यावेळी साशा हायवेल्ड लायन्ससाठी चीअरलीडर म्हणून काम करत होती. सामन्यानंतर क्विंटन डी कॉक तिच्याशी सोशल मीडियावर जोडला गेला आणि नंतर त्यांच्यात मैत्री झाली.

मित्र असतानाच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. साशा आणि डी कॉकनं 2016 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर साशा नेहमीच क्विंटन डी कॉकला पूर्ण पाठिंबा देताना दिसली आहे. साशानं लग्नानंतर चीअरलीडरची नोकरी सोडली आणि आता ती गृहिणी बनली आहे.

साशा अनेक वेळा स्टेडियममध्ये क्विंटन डी कॉकला सपोर्ट करताना दिसली आहे. या जोडप्याला एक मुलगी देखील आहे, जिचा जन्म 2022 मध्ये झाला होता. डी कॉक आणि साशाच्या मुलीचं नाव कियारा आहे. डी कॉक क्रिकेटमधून वेळ काढून सोशल मीडियावर त्याची सुंदर पत्नी आणि लाडक्या मुलीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

निकोलस पूरननं मोडला ‘युनिव्हर्स बॉस’चा 12 वर्ष जुना रेकॉर्ड! अशी कामगिरी करणारा इतिहासातील पहिलाच खेळाडू
वेस्ट इंडिजचा कमबॅक! अमेरिकेला धूळ चारत बदललं सेमीफायनलचं समीकरण
टी20 विश्वचषकात दिसली अमेरिकन पॉवर! कर्णधारानं हाणला 101 मीटर उत्तुंग षटकार; VIDEO व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---