दक्षिण आफ्रिकेत सध्या एसए टी20 लीगची धामधुम सुरू असून, याच लीगच्या मध्यात इंग्लंडचा संघ तीन सामन्यांच्या छोटेखानी वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत आहे. मात्र, पाहुण्या इंग्लंड संघाला दक्षिण आफ्रिकेने अजिबात संधी न देता मालिकेतील पहिले दोन्ही वनडे सामने जिंकत मालिका खिशात घातली. रविवारी (29 जानेवारी) झालेल्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 343 धावांचा यशस्वी पाठलाग करत पाच गड्यांनी विजय साकार केला. कर्णधार टेंबा बवुमा व डेव्हिड मिलर हे दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
A stunning run-chase from South Africa as they take an unassailable lead in the ODI series 🔥#SAvENG | 📝 https://t.co/PGCzEvxFLF pic.twitter.com/64svNGMALH
— ICC (@ICC) January 29, 2023
ब्लोएमफॉंतेन येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. वरच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मधल्या फळीने जबाबदारी घेत मोठी धावसंख्या उभारली. आपला दुसरा सामना खेळत असलेल्या युवा हॅरी ब्रुक याने 80 धावांची तर मोईन अलीने 51 धावा काढल्या. कर्णधार जोस बटलर याने अखेरपर्यंत नाबाद राहत 94 धावांची खेळी करत संघाला 8 बाद 342 अशी मोठी मजल मारून दिली. दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वच गोलंदाज बळी मिळवण्यात यशस्वी ठरले.
या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला कर्णधार टेंबा बवुमा व क्विंटन डी कॉक यांनी दमदार सुरुवात दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 77 धावा केल्या. त्यानंतर बवुमाने रॅसी वॅन डर डसेनसह 97 धावांची भागीदारी केली. यादरम्यान बवुमाने आपले शतक पूर्ण केले. त्याने 102 चेंडूवर 109 धावा केल्या. डसेनने 38, मार्करमने 49 व क्लासेनने 27 धावा बनवत आपल्या संघाला सामन्यात कायम ठेवले. मात्र, त्यानंतर मैदानात उतरलेल्या डेव्हिड मिलर याने तुफानी फलंदाजी करत अवघ्या 31 चेंडूवर अर्धशतक पूर्ण केले. त्याला मार्को जेन्सनने तितकीच तोलामोलाची साथ दिली. मिलरने 58 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजयी केले. बवुमाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
(South Africa Beat England In 2nd ODI By 5 Wickets Miller Bavuma Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विजयी चौकार मारण्याआधी हार्दिकने दिलेला ‘हा’ कानमंत्र, स्वतः सूर्याने केला खुलासा
लखनऊ टी20 नंतर संतापला कॅप्टन हार्दिक! म्हणाला, “टी20 मध्ये तुम्ही अशा खेळपट्ट्या देता?”