---Advertisement---

विजयी चौकार मारण्याआधी हार्दिकने दिलेला ‘हा’ कानमंत्र, स्वतः सूर्याने केला खुलासा

On: सोमवार, जानेवारी 30, 2023 12:23 PM
Hardik Pandya Surykumar yadav
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (29 जानेवारी) लखनऊ येथे खेळला गेला. कमी धावसंख्येच्या झालेल्या या रोमहर्षक सामन्यात भारतीय संघाने अखेरच्या षटकात 6 गडी राखून थरारक विजय मिळवला. भारताच्या विजयामुळे तीन सामन्यांची ही मालिका आता बरोबरीत आली आहे. या सामन्यात संयमी खेळी करणारा सूर्यकुमार यादव भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सामन्यानंतर बोलताना त्याने मैदानावर काय घडले याचा खुलासा केला.

न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमोर केवळ ‌‌‌100 धावांचे आव्हान होते. मात्र, या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव गडगडला. 8.5 षटकात 2 बाद 46 धावा धावफलकावर असताना तो फलंदाजीला आला. मात्र, टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेला सूर्यकुमारही खुलेपणाने खेळू शकला नाही. परंतु त्याने फलंदाजी सुरू ठेवली. अखेरच्या षटकात विजयासाठी 7 धावांची गरज असताना तो खेळत होता. अखेरच्या दोन चेंडूंवर विजयासाठी तीन धावा हव्या असताना सूर्यकुमारने आपल्या डावातील पहिला व विजयी चौकार मारला.

त्याच क्षणाविषयी विचारले असता सूर्यकुमार म्हणाला,

“मी आणि हार्दिकने सामना अखेरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा दोन चेंडू शिल्लक राहिले तेव्हा हार्दिक मला येऊन म्हणाला, तू याच चेंडूवर सामना संपव. ही गोष्ट नक्कीच आत्मविश्वास वाढवणारी ठरली.”

सूर्यकुमारने या सामन्यात आपल्या शैलीच्या विपरीत फलंदाजी केली. त्याने 31 चेंडूंवर 26 धावा केल्या. याच खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. मालिकेतील अखेरचा सामना 1 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे खेळला जाईल. भारतीय संघाने हा सामना जिंकल्यास हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारतीय संघ सर्व टी20 मालिकेत अजिंक्य राहील.

(Suryakumar Yadav Open About Winning Stroke In Lucknow T20I)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या- 

लखनऊ टी20 नंतर संतापला कॅप्टन हार्दिक! म्हणाला, “टी20 मध्ये तुम्ही अशा खेळपट्ट्या देता?” 

लखनऊमध्ये घडली टी20 क्रिकेटमधील दुर्मिळ घटना, दोन्ही संघांचे फलंदाज ठरले हतबल 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---