---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा यजमानांना दे धक्का! सेमीफायलमध्ये मारली धडक

On: सोमवार, जून 24, 2024 11:27 AM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 मधील सुपर 8 सामना 24 जून (सोमवार) रोजी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना रंगला होता. नॉर्थ साऊंड येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजवर 3 गडी राखून विजय मिळवला.

या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 17 षटकात 123 धावांचं लक्ष्य मिळालं, जे त्यांनी पाच चेंडू शिल्लक असताना गाठलं. या विजयासह आफ्रिकेनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या गटातून इंग्लंडनं आधीच उपांत्य फेरी गाठली होती. गट 2 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं 6 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं असून, इंग्लिश संघ 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या डावात दोन षटकं झाले असताना पाऊस आला. त्यावेळी आफ्रिकन संघाची धावसंख्या दोन विकेटवर 15 धावा होती. पाऊस थांबल्यानंतर आफ्रिकेला डकवर्थ लुईस नियामानुसार सुधारित लक्ष्य मिळालं. दक्षिण आफ्रिकेसाठी ट्रिस्टन स्टब्सनं 27 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीनं 29 धावा केल्या. तर हेन्रिक क्लासेननं 22 धावांची खेळी केली.

दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या षटकात 5 धावा करायच्या होत्या. ओबेड मॅकॉयच्या या षटकात मार्को जॅनसेननं पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत आफ्रिकेला विजय मिळवून दिला. जॅनसेननं नाबाद 21 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसनं सर्वाधिक 3 बळी घेतले. तर आंद्रे रसेल आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी दोन बळी मिळाले.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजनं 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 135 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजसाठी निकोलस पूरननं 42 चेंडूत 3 चौकार आणि दोन षटकारांसह 52 धावांची शानदार खेळी केली. तर सलामीवीर फलंदाज काईल मेयर्सनं 34 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 35 धावा केल्या. आंद्रे रसेल (15) आणि अल्झारी जोसेफ (11*) यांनाही दुहेरी आकडा गाठण्यात यश आलं. आफ्रिकेकडून फिरकीपटू तबरेझ शम्सीनं 27 धावांत तीन बळी घेतले. तर केशव महाराज, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा आणि एडन मार्कराम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचं सावट, मॅच रद्द झाल्यास कोणाचा फायदा? सेमीफायनलचं समीकरण समजून घ्या
अमेरिकेविरुद्ध आलं जोस बटलरचं वादळ! युवराज सिंगचा रेकॉर्ड थोडक्यात वाचला
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? संजू सॅमसनला संघात स्थान मिळेल का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---