दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना केपटाऊनमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच डावात मोहम्मद सिराज याने भेदक गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 55 धावांवर गुंडाळले. सिराजने या सामन्यात 9 षटकांमध्ये 15 धावा खर्च करून सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील तिसरा ‘फाईव्ह विकेट हॉल’ ठरला. सिराज आणि एकंदरीत भारतीय संघासाठी नवीन वर्षाची सुरुवात बुधवारी अप्रतिम झाली.
मोहम्मद सिराचप्रामाणेच जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. काईल वेरेन याने दक्षिण आफ्रिकेसाठी 15 धावांची सर्वोत्तम खेळी केली. दक्षिण आफ्रिकेचे सलामी फलंदाज ऍडेन मार्करम आणि कर्णधार डीन एल्गर यांनी अनुक्रमे 2 आणि 4 धावा करून विकेट गमावल्या. मार्करमला सिराजने यशस्वी जयस्वाच्या हातात झेलबाद केले, तर एल्गर सिराजच्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला. तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा टोनी डी झोर्झी 17 चेंडूत 2 धावा करून सिराजचीच शिकार बनला. झोर्झीने यष्टीरक्षक केएल राहुलच्या हातात विकेट गमावली. चौथ्या क्रमांकावरील ट्रिस्टन स्टब्स याने 3 धावांवर रोहित शर्माच्या हाता विकेट गमावली. स्टब्सची विकेट जसप्रीत बुमराहला मिळाली.
डेव्हिड बेडिंगहॅम आणि काईल वेरेन यांनी 12 आणि 15 धावा करून मोहम्मद सिराजच्या चेंडूवर विकेट गमावल्या. मार्को जेनसन याला सिराजने शुन्यावर बाद केले. त्यानंतर आलेल्या केशव महाराज आणि कागिरो रबाडा यांना मुकेश कुमारने अनुक्रमे 3 आणि 5 धावांच्या वैयक्तिक खेळीनंतर तंबूत धाडले. त्यानंतर आलेल्या नांद्रे बर्गर यानेही अवघ्या 4 धावा करून जसप्रीत बुमराहा आपली विकेट दिली.
जसप्रीत बुमराह याने 8 षटके गोलंदाजी केल्यानंतर 25 धावा खर्च केल्या आणि तीन विकेट्स घेतल्या. तसेच मुकेश कुमार याने शुन्य धावा खर्च करून दोन विकेट्स घेतल्या. मुकेशने टाकलेल्या 2.2 षटकांमध्ये आफ्रिकी संघाचे फलंदाज एकही धाव घेऊ शकले नाहीत. (SOUTH AFRICA BOWLED OUT FOR JUST 55…!)
पहिल्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर, एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, लुंगी एलगिडी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
IND vs SA: यजमानांनी टाॅस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय, ‘या’ दोन बदलांसह भारत करणार गोलंदाजी
IND vs SA: रोहित शर्माचं दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘तो आमच्याविरुद्ध खूप…’