दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी मोहम्मद सिराज याने सर्वांना अवाक केले. सिराजने अवघ्या 9 धावा खर्च करून या डावात आपल्या पाच विकेट्स पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमधील हा त्याचा तिसरा ‘फाईव्ह विकेट हॉल’ ठरला. बुधवारी (3 जानेवारी) सुरू झालेल्या या सामन्यात भारताच्या भेदक गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव स्वस्तात गुंडाळला गेला. सिराजने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडीजनंतर दक्षिण आफ्रिकेतही स्वतःला सिद्ध केले.
मोहम्मद सिराज याने भारतासाठी पहिला कसोटी सामना डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. 2021 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने कारकिर्दीत पहिल्यांदा एका डावात पाच विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन कसोटीत तिसऱ्या डावात त्याने 73 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर कसोटी क्रिकेटमधील दुसरे विकेट्सचे पंचक सिराजने मागच्या वर्षी जुलै महिन्यात वेस्ट इंडीजमध्ये घेतल्या. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध खेळताना सिराजने पहिल्या डावात 60 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर बुधवारी (3 जानेवारी) त्याने तिसऱ्यांदा एका डावात पाच विकेट्स घेऊन दक्षिण आफ्रिकेमधील खेळपट्टीवर देखील स्वतःला सिद्ध केले. सिराजने या सामन्यात टाकलेल्या 9 षटकांमध्ये 15 धावा खर्च करून 6 विकेट्स नावावर केल्या.
ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीजनंतर सिराजने दक्षिण आफ्रिकेतही स्वतःला सिद्ध केले. पण इंग्लंडमध्ये अद्याप त्याला ही कामगिरी जमली नाहीये. सिराज इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकदाही ‘फाईव्ह विकेट हॉल’ घेऊ शकला नाहीये. असे असले तरी, 2021 च्या इंग्लंड दौरा सिराजने गाजवला हे नक्की. दौऱ्यातील इंग्लंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळला गेला होता. या सामन्यातील दोन्ही डावांमध्ये सिराजने चार-चार विकेट्स घेतल भारताला विजय मिळवून दिला होता. त्याआधी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने एकूण तीन, तर तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात सामन्यात दोन आणि एक विकेट घेतली होती.
भारताबाहेरील कसोटी सामन्यात सिराजचे सर्वोत्तम प्रदर्शन
दक्षिण आफ्रिका – विकेट्सचे पंचक (2024)
वेस्ट इंडीज – विकेट्सचे पंचक (2023)
ऑस्ट्रेलिया – विकेट्सचे पंचक (2021)
इंग्लंड – चार विकेट्स हॉल (2021)
दरम्यान, सिराजसह या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या डावात 23.2 षटकांणध्ये अवघ्या 55 धावा करून सर्वबाद झाला. या सुमार प्रदर्शनामुळे आफ्रिकी संघ भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वात कमी धावसंख्येवर बाद होणारा संघ देखील बनला.
पहिल्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर, एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, लुंगी एलगिडी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
महत्वाच्या बातम्या –
IND vs SA: यजमानांनी टाॅस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय, ‘या’ दोन बदलांसह भारत करणार गोलंदाजी
AUS vs PAK: पहिल्या डावात पाकिस्तान संघ 313 धावांवर सर्वबाद, कर्णधार पॅट कमिन्सने घेतलं विकेट्सचं पंचक