दक्षिण आफ्रिकेने जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्धची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका रद्द केली आहे. बोर्डाने बुधवारी याला दुजोरा दिला. ऑस्ट्रेलियन क्रिकेटने सांगितले की, १२, १४ आणि १७ जानेवारीला होबार्ट, सिडनी आणि पर्थ येथे होणारे सामने रद्द करण्यात आले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले म्हणाले की, क्रिकेट दक्षिण आफ्रिका जानेवारीमध्ये एकदिवसीय मालिका खेळू शकणार नाही हे निराशाजनक आहे. ही संपूर्ण मालिका आयसीसी सुपर लीगचा भाग होती, ज्यामधून संघ थेट २०२३
विश्वचषकासाठी पात्र ठरतील. दक्षिण आफ्रिकेने देशांतर्गत टी२० लीगमुळे तारखेत बदल करण्याबाबत बोलले होते, परंतु ऑस्ट्रेलियन बोर्डाने तसे करण्यास असमर्थता व्यक्त केली. आता थेट विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या पात्रतेबाबत साशंकता आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ डिसेंबर आणि जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेळापत्रकानुसार ३ कसोटी सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलियन बोर्डाच्या इतर अनेक कार्यक्रमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. ७ ऑक्टोबर रोजी, वेस्ट इंडिजविरुद्धचा टी२० सामना ब्रिस्बेनहून गोल्ड कोस्टला तर इंग्लंडविरुद्धचा टी२० सामना ब्रिस्बेनहून पर्थला हलवण्यात आला. त्याचवेळी, २६ जानेवारीला पाकिस्तान विरुद्ध महिला टी२० सामना आता कॅनबेराऐवजी होबार्टमध्ये खेळवला जाईल.
विश्वचषक सुपर लीगमधील प्रत्येक सामन्यात १० गुण आहेत. एकदिवसीय मालिका न खेळल्यास दक्षिण आफ्रिका ३० गुण वजा करू शकते. सुपर लीगबद्दल बोलायचे झाले तर एकूण १३ संघांचा यात समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक संघाला २४ सामने खेळायचे आहेत. यजमान भारतासह टॉप८ संघांना थेट प्रवेश मिळेल. तर इतर ५ संघांना क्वालिफायर खेळायचे आहेत. २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे.
इंग्लंड संघ अव्वल
पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंडचा संघ सध्या १२५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याने १८ सामने खेळले आहेत. १२ मध्ये जिंकले, तर ५ मध्ये पराभूत. बांगलादेशचे १८ सामन्यांत १२० गुण आहेत तर अफगाणिस्तानचे १२ सामन्यांत १०० गुण आहेत. इतर कोणत्याही संघाने आतापर्यंत १०० गुणांचा टप्पा गाठलेला नाही. टीम इंडियाचे १२ सामन्यांत ७९ गुण झाले असून ते ७व्या क्रमांकावर आहे. त्याने ८ सामने जिंकले आहेत, तर ४ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत १३ पैकी फक्त ४ सामने जिंकले आहेत. संघ ४९ गुणांसह ११व्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत इतर ३ सामन्यांचे गुण वजा केल्यास त्याचा मार्ग कठीण होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
इंग्लंडला हरवून टीम इंडिया ठरलीये पाकिस्तानपेक्षा वरचढं, क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान
१० विकेट्सने सामना जिंकणे भारताच्या ‘बाए हाथ का खेल’, ‘एवढ्या’ वेळा केलीये ही कामगिरी
भारतानं इंग्लंडला हरवलं अन् दादाने टी-शर्ट काढला, सोबतच्या खेळाडूलाही दिला होता सल्ला






