दक्षिण आफ्रिका संघ सध्या आयर्लंड संघाविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळत आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्याचा निकाल न लागल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ वनडे मालिका बरोबरीत सोडण्यात यशस्वी ठरला. यानंतर आता त्यांनी टी20 मालिका जिंकली आहे. पण दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा अडचणीत सापडला आहे. आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केल्याबद्दल त्याला कठोरपणे फटकारण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा याला आयसीसीने दंड ठोठावला आहे. कारण आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल एकमध्ये तो दोषी आढळला आहे. टेंबा बावुमा यांनी आयसीसीच्या कलम 2.3 चे उल्लंघन केले आहे. हा कलम सामन्यादरम्यान अभद्र भाषा बोलण्याशी संबंधित आहे.
एखादा खेळाडू चालू सामन्यात आक्रमक पद्धतीने काही बोलला. तर ते स्टंप माइकच्या साहाय्याने प्रेक्षक ऐकू शकतात. या चुकीची शिक्षा आयसीसीद्वारे खेळाडूला मिळते. त्याचप्रमाणे बावुमाच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराप्रमाणेच एक डिमरेट पॉईंटदेखील जोडला गेला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील सहाव्या षटकात ही घटना घडली. जेव्हा यष्टीरक्षकाने झेल पकडला. त्यानंतर बावुमा काही आक्षेपार्ह शब्द बोलताना आढळला. मॅच रेफरी केविन गलाघर यांनी त्याच्यावर हे आरोप केले होते. पण बावुमाने आपल्यावरील आरोप मान्य केले आहेत. तसेच आयसीसी क्रिकेट ऑपरेशन विभागाने कोविड 19 च्या अंतरिम क्रीडा नियमानुसार याची पुष्टी केली होती. त्यामुळे अधिकृत सुनावणीची आवश्यकता भासली नाही. मैदानी पंच एलन नील आणि मार्क हॅथॉर्न, तिसरे पंच रोलँड ब्लॅक आणि चौथे अधिकारी पॉल रेनॉल्ड्स यांनीही त्याच्याविरुद्ध आरोप केले आहेत.
आयसीसीच्या प्लेअर आणि प्लेअर सपोर्ट स्टाफच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 च्या उल्लंघनानंतर संबंधित खेळाडूला सामना फीच्या 50 टक्के दंड आणि एक किंवा दोन डिमेरिट गुणांची शिक्षा दिली जाते.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रशिक्षक द्रविड यांचा आवडता बनला आहे ‘हा’ खेळाडू! सातत्याने अपयशी ठरूनही देतायत संधी
‘गरीबों का सस्ता वाला बेन स्टोक्स’; लंकेविरुद्ध सपशेल फ्लॉप ठरलेला हार्दिक झाला ट्रोल