दक्षिण अफ्रिका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर (mark baucher) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. बाऊचर यांच्यावर वर्णभेदाचे आरोप केले गेले आहेत. याच कारणास्तव क्रिकेट साऊथ अफ्रिकाने (CSA) या प्रकरणातील अनुशासनात्मक सुनावणीसाठी वरिष्ठ वकिल टॅरी मोताऊ यांना अध्यक्षपदी नियुक्त केले आहे. सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय निर्माण (एसजेएन) च्या सुनावणीदरम्यान गैरवर्तनाचा आरोप असलेले प्रशिक्षक मार्क बाऊचर यांना आता अनुशासनात्मक सुनावणीला सामोरे जावे लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता बाऊचरकडून संघाचे मुख्य प्रशिक्षकपद काढून घेतले जाण्याची पूर्ण शक्यता आहे.
मार्क बाऊचर व्यतिरिक्त दक्षिण अफ्रिकेच्या इतर दुसऱ्या दोन दिग्गजांवर देखील खेळाडूंसोबत भेदभाव केल्याचा आरोप केला गेला आहे. बाऊचरसह क्रिकेट दक्षिण आफ्रिकाचे सध्याचे संचालक ग्रॅमी स्मिथ आणि माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्स यांच्या देखील हे आरोप लावले गेले होते. यानंतर आता ही नियुक्ती केली गेली आहे.
क्रिकेट साऊथ अफ्रिकाने सांगितले की, “२६ जानेवारी २०२२ ला पहिली सुनावणी होईल आणि त्यानंतर पुढच्या तारखा ठरवल्या जातील. एसजेएन सुनावणीनंतर असे करणे अनिवार्य होते, कारण सुनावणीदरम्यान बाऊचरसह अनेक जबाबदार व्यक्तिंवर भेदभाव आणि वर्णद्वेषाचे आरोप केले गेले होते. विशेषतः बाऊचरवर त्याचा माजी सहकारी पॉल एडम्सने वर्णद्वेषाचे आरोप लावले होते. या संदर्भात १७ जानेवारीला बाऊचरविरोधात एक आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि याची माहिती बाऊचरला देखील दिली गेली. सीएसए या संदर्भात सर्व आरोपींची स्वतंत्र चौकशी करून काही कलम लावेल.”
दरम्यान, डिसेंबर २०२१ जाहीर करण्यात आलेल्या एसजेएनच्या अहवालानुसार बाऊचरसह इतर अनेक महत्वाच्या व्यक्तिंवर गंभीर आरोप केले गेले होते. परंतु लोकपाल डुमिसा एनट्सबेजा यांना यासदर्भात पुरेसे पुरावे मिळाले नव्हते. लोकपाल यांनी सीएसएला यासंदर्भात भविष्यात कारवाई करण्याची विनंती केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
धक्कादायक! बिहार पोलिसांनी सचिनचा चाहता ‘सुधीर कुमार’ला चोपलं, वाचा सविस्तर
मोठी बातमी! भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू कोरोनाच्या विळख्यात, सोशलवर दिली माहिती
दुसरी वनडे : केएल राहुलने टाॅस जिंकला, भारत प्रथम बॅटींग करणार; पाहा कोणकोण खेळतंय दुसर्या सामन्यात
व्हिडिओ पाहा –