---Advertisement---

दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या वार्षिक पुरस्कारांत भारतीयांची बाजी; वाचा संपूर्ण यादी

On: सोमवार, ऑगस्ट 15, 2022 10:03 PM
africa-odi-win
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने नुकतेच आपले २०२१-२०२२ या वर्षाचे आपले वार्षिक क्रिकेट पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटर म्हणून भारतीय वंशाचा अष्टपैलू केशव महाराज यांची निवड केली गेली. तर, महिला विभागात अनुभवी वेगवान गोलंदाज आयाबोंगा खाका हिने हा पुरस्कार आपल्या नावे केला.

मागील दोन दिवसांपासून दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड सातत्याने यातील एकेका पुरस्कार विजेत्याचे नाव घोषित करत होते. त्यानंतर सोमवारी (१५ ऑगस्ट) या पुरस्कारांची अंतिम यादी जाहीर केली गेली. पुरुष गटात महाराज सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू बनला. तर, सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा, सर्वोत्तम वनडे खेळाडू म्हणून जानेमन मलान व सर्वोत्तम टी२० खेळाडू म्हणून एडेन मार्करमला यांना घोषित केले गेले. सर्वोत्कृष्ट युवा टी२० खेळाडू म्हणून बेबी एबी नावाने प्रसिद्ध असलेल्या डेवाल्ड ब्रेविसला गौरविले गेले.

महिला विभागात खाकाव्यतिरिक्त सर्वोत्तम वनडे खेळाडू म्हणून लॉरा वॉल्वर्ड आणि टी२० मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून नुकतीच निवृत्त झालेल्या लिझे ली हिला सन्मानित केले गेले. प्रेक्षकांचा आवडता खेळाडू म्हणून अनुभवी डेव्हिड मिलर याने बाजी मारली. युवा अष्टपैलू मार्को जेन्सनला सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू म्हणून निवडले गेले. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व पुरस्कारांवर अष्टपैलू सिंसांडा मगाला याची हूकुमत राहिली. वनडे क्रिकेटर ऑफ द इयर, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर व डोमेस्टिक क्रिकेटर ऑफ द इयर असे तीन पुरस्कार त्याने आपल्या नावे केले. यावर्षीचे सर्वोत्कृष्ट पंच म्हणून भारतीय वंशाच्या अल्लाउद्दीन पालेकर यांची निवड केली गेली.

पुरस्कार विजेत्यांचे दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी फोलेत्सी मोसेकी यांनी अभिनंदन केले. तसेच आगामी काळात खेळाडूंना शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आमची भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाशी बरोबरीच होऊ शकत नाही’, खुद्द दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूचे भाष्य

‘सचिन तेंडूलकरला मी ओळखतच नव्हतो!’, शोएब अख्तरचा आणखी एक अजब दावा

शॉकिंग! मुंबई इंडियन्सच्या संघ मालकाला पुढील ३ तासांत संपवण्याची धमकी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---