---Advertisement---

चाहती पण मुलीसारखीच असते ना! मिलरच्या ‘त्या’ पोस्टने सगळेच फसले, पण नवीन धडाही मिळालाय, वाचा सविस्तर

On: शनिवार, ऑक्टोबर 8, 2022 9:59 PM
David-Miller
---Advertisement---

क्रीडाविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघातील धडाकेबाज फलंदाज डेविड मिलर याच्याशी संबंधित आहे. मिलरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मुलीसमान चाहतीचे शनिवारी (दि. 8 ऑक्टोबर) निधन झाले आहे. याची माहिती स्वत: मिलरने एक भावूक व्हिडिओ शेअर करत दिली आहे. या बातमीने त्याच्या चाहत्यांसोबतच क्रिकेटविश्वालाही मोठा धक्का दिला आहे. मिलरचे चाहते आता सोशल मीडियावर त्याच्या चाहतीला श्रद्धांजली वाहत आहेत.

मिलरची भावूक पोस्ट
डेविड मिलर (David Miller) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर ही दु:खद बातमी दिली. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, “देव तुझ्या आत्म्याला शांती देवो माझी गोड लेक. मी तुझ्यावर नेहमी प्रेम करत राहील.”

https://www.instagram.com/reel/CjdQ_cugnGS/?utm_source=ig_embed&ig_rid=9e009435-11e3-4833-9047-f998c19ad5a6

मिलरच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच इतर क्रिकेटपटूही शोक व्यक्त करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, “या कठीण परिस्थितीत स्वत:ला आवर भावा.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “तुला आणि तुझ्या कुटुंबाला माझ्या संवेदना. काळजी घ्या.” आणखी एका चाहत्याने लिहिले की, “तिच्या आत्म्याला शांती लाभो.” तसेच, एक चाहता म्हणाला की, “खरोखर दु:खद बातमी. चिमुकलीच्या आत्म्याला शांती लाभो. मिलर मजबूत राहा.”

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा
दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी आले आहेत. उभय संघात 3 सामन्यांची टी20 मालिका पार पडली असून भारताने ही मालिका 2-1ने जिंकली आहे. या स्पर्धेत मिलरने मधल्या फळीत फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसाठी दमदार प्रदर्शन केले आहे. त्याने दुसऱ्या टी20 सामन्यात नाबाद 106 धावांची खेळी केली होती. याव्यतिरिक्त भारतीय संघाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातही त्याने नाबाद 75 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने भारताविरुद्ध विजय मिळवत मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे.

मिलरची कारकीर्द
मिलरच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने दक्षिण आफ्रिका संघाकडून 147 वनडे आणि 107 टी20 सामने खेळले आहेत. वनडेत त्याने 41.54च्या सरासरीने 3614 धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने 5 शतके आणि 18 अर्धशतके झळकावली आहेत. याव्यतिरिक्त त्याने टी20मध्ये 2069 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याच्या नावावर 5 अर्धशतके आहेत..

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्याच्या जीवावर खेळणार होते तोच बाहेर! आयर्लंडच्या प्रमुख गोलंदाजाची वर्ल्डकपमधून एक्झिट
चेंडू 110 मीटर गेला, तरीही टिम डेविडचे नाही भरले मन; म्हणाला, ‘पुढच्या वेळी…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---