बुधवारी (18 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सामन्यात शुबमन गिलने जोरदार द्विशतक साजरे केले. इकडे गिलचे द्विशतक क्रिकेटविश्व साजरे करत असताना एक धक्कादायक बातमी समोर आली. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम आमलाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
JUST IN: Hashim Amla has announced his retirement from all forms of the game.
The South African great retires with 89 professional hundred to his name.
What's your favourite memory from Amla's career? pic.twitter.com/o7iCvjCwiR
— Wisden (@WisdenCricket) January 18, 2023
आमलाचे सध्याचे वय 39 वर्ष असून, त्याने व्यावसायिक क्रिकेटमध्ये तब्बल 34, 104 धावा केल्या आहेत. 1999 साली आमलाने आपल्या व्यावसायिक क्रिकेटची सुरुवात केली होती. त्यानंतर जवळपास दोन दशकांनी त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केले आहे. आमला प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 265, लिस्ट ए क्रिकेटमध्ये 247 तर टी20 क्रिकेटमध्ये 164 सामने खेळला आहे. त्याला कायमच एक चिवट फलंदाज म्हणून ओळखले गेले. विशेष म्हणजे त्याने भारतीय संघाला कायम त्रास दिला.
अनेक वर्ष दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची धुरा सांभाळलेल्या आमलाने कसोटी संघाचे नेतृत्व देखील केले होते. 2019 वन डे विश्वचषकानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली. मात्र, त्यानंतर तो इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळताना दिसत होता. सरे काऊंटीसाठी तो मागील वर्षीपर्यंत खेळला. त्याने अनेक आयसीसी पुरस्कारांवर देखील आपले नाव कोरले होते. सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या एसए टी20 लीगमध्ये एमआय केपटाऊन संघाचा प्रशिक्षक म्हणून तो जबाबदारी सांभाळत आहे.
(South Africa formal captain Hashim Amla Announced Retirement From All Forms Of The Cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गिलने मैदान मारलं! शुबमनचे न्यूझीलंडविरुद्ध विक्रमी द्विशतक, गोलंदाजांची मोडली कंबर
तूच रे पठ्ठ्या! गिलने शतक ठोकताच नावावर मोठ्या विक्रमाची नोंद, विराट अन् धवनलाही टाकले मागे