दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघानं इम्रान खानची नव्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. हे जाणून आश्चर्य वाटेल की या खेळाडूच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ 20 धावा आहेत. इम्रान खाननं (Imraan Khan) 2009मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी पदार्पण केलं होतं. या खेळाडूची पदार्पणाची कसोटी ही त्याची शेवटची कसोटी ठरली. तरीही आफ्रिकेनं इम्रान खानची फलंदाजी प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे.
इम्रान खाननं (Imraan Khan) दक्षिण आफ्रिकेत देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रशिक्षक म्हणून खूप यश मिळवलं आहे. इम्रान खानच्या प्रशिक्षणाखाली डॉल्फिननं चार दिवसांच्या मालिकेचं विजेतेपद दोनदा जिंकलं आहे. याशिवाय त्यानं युनायटेड एकदिवसीय चषक आणि तीन सीएसए टी20 चॅलेंज फायनलमध्ये संघ पोहोचवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा फलंदाजी प्रशिक्षक बनल्यानंतर इम्रान खान म्हणाला की, “मी क्रिकेट युनियनचे सर्व समर्थनासाठी आभार मानू इच्छितो, हा एक अविश्वसनीय प्रवास होता.”
पुढे बोलताना इम्रान खान म्हणाला की, “बऱ्याच हंगामांपासून माझे घर असलेल्या क्लबमध्ये माझी प्रशिक्षक कारकीर्द सुरु करण्यासाठी मला खूप छान वाटत आहे. प्रशिक्षक म्हणून माझ्या मार्गावर हे एक रोमांचक पाऊल आहे, परंतू किंग्समेड नेहमीच माझे घर असेल आणि मला येथे प्रत्येकाची आठवण येईल.”
इम्रान खान हा टॉप ऑर्डरचा फलंदाज आहे. या फलंदाजानं 61 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 9,367 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 20 वेळा शतकांचा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय इम्रान खाननं 121 लिस्ट ए सामने आणि 51 टी20 सामने खेळले आहेत. 51 टी20 सामन्यांमध्ये त्यानं 556 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 90.40 राहिला. टी20 मध्ये त्यानं 1 अर्धशतक लगावलं आहे. तर 121 लिस्ट ए सामन्यात त्यानं 2,954 धावा केल्या. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 21 अर्धशतकांसह 3 शतक आहेत.
इम्रान खानच्या (Imran Khan) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं दक्षिण आफ्रिकेसाठी 19 मार्च 2009 साली कसोटी पदार्पण केलं होतं. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा सामना बलाढ्य संघ ऑस्ट्रेलियाशी होता. या सामन्यात इम्रान खाननं 20 धावांची खेळी खेळली. त्याच्या खेळीत त्यानं 1 चौकार लगावला. हा त्याचा पहिला आणि शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
पोलार्डनं ठोकला खतरनाक षटकार! समालोचन करणारा संगकारा थोडक्यात हुकला, पाहा VIDEO
बांगलादेशचा हिंदू क्रिकेटपटू लिटन दासचं आंदोलकांनी खरंच घर पेटवलं का? जाणून घ्या सत्य
आयपीएल 2025च्या हंगामात बदलणार 6 संघांचे कर्णधार?