---Advertisement---

महत्त्वाची बातमी: वर्ल्डकप तोंडावर असतानाच दक्षिण आफ्रिका संघात घडली मोठी घडामोड; वाचा सविस्तर

---Advertisement---

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेला आता केवळ एक महिना शिल्लक आहे. विश्वचषक अगदी तोंडावर आला असताना दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली. दक्षिण आफ्रिका संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर या विश्वचषकानंतर आपले पद सोडणार आहेत. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत ही माहिती दिली. क्रिकेट दक्षिण आफ्रिका क्रिकेटने एका निवेदनात म्हटले आहे की, भविष्यात प्रशिक्षकपदाच्या नवीन संधी शोधण्यासाठी बाऊचरने आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

दक्षिण आफ्रिकेचा सर्वकालीन महान यष्टीरक्षक असलेल्या बाऊचरने डिसेंबर 2019 मध्ये संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्याच्या प्रशिक्षणात दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत 10 कसोटी, 12 वनडे सामने, 23 टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. बाऊचरच्याच प्रशिक्षणात दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिकेत भारताला 2-1 ने पराभूत केले होते. एका प्रसिद्ध क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, बाऊचर आगामी एसए टी20 लीगमध्ये एमआय केपटाऊनचे प्रशिक्षकपद स्वीकारू शकतो. दक्षिण आफ्रिकेला सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये भारताविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे आणि त्यानंतर संघ विश्वचषकासाठी रवाना होईल.

सीएसएचे मुख्य कार्यकारी अधिकारी फोलेत्सी मोसेकी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले,  “मार्कने गेल्या तीन वर्षांत मुख्य प्रशिक्षक म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटमध्ये वेळ आणि मेहनत घेतल्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानू इच्छितो. अनेक वरिष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीनंतर त्याने खडतर परिस्थितीतून संघाला बाहेर काढत, पुढील पिढीसाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेटचा पाया मजबूत करण्यास मदत केली.”

याच निवेदनात लवकरच पुढील प्रशिक्षकाच्या नावाची देखील घोषणा करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

क्या बात! सलग आठ टी20 विश्वचषकात टीम इंडियात निवड झालेला ‘तो’ एकमेव खेळाडू
अरे, याला नाही घेणार टीममध्ये! आता ‘तोच’ झालायं भारताच्या टी20 विश्वचषक संघात इन
मोठी बातमी: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्त्व 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---