---Advertisement---

कसोटी मालिकेपूर्वीच दक्षिण आफ्रिकेचा हेड कोच झाला घमंडी, भारताविरुद्ध म्हणाला ‘असे’ काही; वाचाच

Shukri-Conrad
---Advertisement---

Shukri Conrad Statement: भारताविरुद्ध ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाचे वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि लुंगी एंगिडी यांनी सरावाला सुरुवात केली आहे. अशात यजमान संघाचे मुख्य प्रशिक्षक शुकरी कॉनरड यांनी आशा व्यक्त केली आहे की, भारतीय संघ त्यांच्या कसोटी अभियानाच्या ‘फायनल फ्रंटियर’ जिंकण्यात अपयशी ठरेल. खरं तर, रबाडाला टाचेच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकेतून विश्रांती दिली होती, तर एंगिडीला टी20 मालिकेपूर्वी डाव्या घोट्याला दुखापत झाली होती.

कागिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि लुंगी एंगिडी (Lungi Ngidi) यांनी शनिवारी (दि. 23 डिसेंबर) सुपरस्पोर्ट्स पार्क मैदानावर संघाच्या नेट सत्रात चांगला सराव केला होता. यादरम्यान त्यांचा सामना अनुभवी फलंदाज डीन एल्गर करत होता. एल्गरने मालिकेनंतर निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. सेंच्युरियनच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना फायदा मिळतो, पण भारताने मागील दौऱ्यात या स्टेडिअममध्ये दक्षिण आफ्रिकेपेक्षा चांगले प्रदर्शन केले होते.

काय म्हणाले कॉनरड?
शुकरी कॉनरड (Shukri Conrad) म्हणाले की, त्यांचे मुख्य वेगवान गोलंदाज ताजेतवाने होतील आणि पूर्ण ताकदीने गोलंदाजी करतील. त्यांनी सराव सत्राच्या पहिल्या दिवशी म्हटले, “ते ताजेतवाने आणि आक्रमक असतील. मी नेहमीच ताजेतवाने राहणाऱ्या खेळाडूंवर विश्वास ठेवतो.” खरं तर, दोन्ही अनुभवी गोलंदाज कोणत्याही सराव सामन्याशिवाय भारताविरुद्ध उतरणार आहेत, पण प्रशिक्षकांना याची जास्त चिंता नाहीये.

ते म्हणाले, “त्यांना जर घरच्या सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली असती, तर चांगले झाले असते. मात्र, हेच आयुष्य आहे. प्रत्येकाला मार्ग शोधावा लागतो. मी याबाबत चिंतीत नाहीये की, ते कोणत्याही सराव सामन्याशिवाय भारताविरुद्ध खेळतील.” ते म्हणाले, “रबाडा आणि लुंगी 15 सदस्यीय संघात आहेत आणि निवडीसाठी उपलब्ध आहेत. आम्ही निवडीविषयी कोणताही निर्णय उद्या घेऊ. आशा आहे की, उद्या सकाळी आमच्याकडे निवडीसाठी 15 लोकांचा संपूर्ण संघ असेल.”‘भारताला यशस्वी होऊ देणार नाही’
ते म्हणाले की, “आम्हाला निश्चितरीत्या तो गौरवपूर्ण विक्रम कायम राखायचा आहे. तसेच, याची खात्री करायची आहे की, भारत मालिका जिंकण्यात यशस्वी होणार नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी ही यावर्षीची सर्वात मोठी मालिका आहे. भारताने याला ‘फायनल फ्रंटियर’ बनवले आहे, पण ते यात यशस्वी होणार नाहीत, याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करू.”

प्रथम श्रेणीचे माजी खेळाडू कॉनरड यांच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नाहीये. मात्र, ते दक्षिण आफ्रिकेचे पूर्णवेळ प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत. 56 वर्षीय प्रशिक्षकांना माहितीये की, भारत 1992पासून आतापर्यंत आपल्या 8 प्रयत्नात एकदाही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकू शकला नाहीये. ही पहिली वेळ असेल की, भारत फक्त 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेला मंगळवारपासून (दि. 26 डिसेंबर) सुरुवात होत आहे. (south africa head coach shukri conrad bold statement ahead sa vs ind 2 matches test series 2023)

हेही वाचा-
हरमनसेनेचा भीमपराक्रम! वानखेडे कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या नांग्या ठेचत घडवला इतिहास, स्मृतीचा विजयी चौकार
बोंबला! IND vs SA पहिल्या कसोटीत पावसाची शक्यता, क्यूरेटरच्या विधानाने वाढू शकतात टीम इंडियाच्या अडचणी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---