---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेच्या टी20 इतिहासात मोठा बदल! डेल स्टेनला मागे टाकत ‘या’ गोलंदाजाने रचला इतिहास

On: गुरूवार, जुलै 17, 2025 8:30 AM
Dale Steyn
---Advertisement---

तिरंगी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 21 धावांनी पराभव करून मालिकेत दमदार सुरुवात केली. पहिल्या सामन्यात आफ्रिकेने झिम्बाब्वेचा पराभव केला होता. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात एक मोठी कामगिरी केली. लुंगी हा दक्षिण आफ्रिकेकडून टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने महान डेल स्टेनला मागे टाकले.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी हा टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी तिसरा सर्वात यशस्वी बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात लुंगीने एक विकेट घेतली. यासह, आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये त्याच्या विकेट्सची संख्या 65 वर पोहोचली आहे. जेल स्टेनने 47 सामन्यांमध्ये 65 विकेट्स घेतल्या, तर लुंगीने फक्त 45 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. डावखुरा फिरकी गोलंदाज तबरेज शम्सी या यादीत अव्वल स्थानावर आहे. शम्सीने 70 सामन्यांमध्ये 89 विकेट्स घेतल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने 65 सामन्यांमध्ये 71 विकेट्स घेतल्या आहेत. लुंगी एनगिडीने न्यूझीलंडचा सलामीवीर टिम सेफर्टचा बळी घेत डेल स्टेनचा विक्रम मागे टाकला. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने 20 षटकांत 5 गडी गमावून 173 धावा केल्या. न्यूझीलंडकडून टिम सेफर्टने 16 चेंडूत 22 धावा, टिम रॉबिन्सनने 57 चेंडूत 75 धावा आणि बेवन जेकब्सने 30 चेंडूत 44 धावा केल्या.

प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेचा संघ 18.2 षटकांत सर्व विकेट गमावून केवळ 152 धावा करू शकला. प्रिटोरियसने 27, डेवाल्ड ब्रेव्हिसने 35 आणि जॉर्ज लिंडेने 30 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री आणि जेकबने 3-3 आणि सोधीने 2 विकेट घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---