सेंच्युरीयन। दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्ध सुरु असालेल्या सहाव्या वनडे सामन्यात पहिले दोन झटके लवकर बसले आहेत. सलामीवीर फलंदाज हाशिम आमला आणि प्रभारी कर्णधार एडिन मार्करम या दोघांच्या विकेट्स लवकर पडल्या आहेत.
आज भारतीय संघात स्थान मिळालेल्या शार्दूल ठाकूरने अमला आणि मार्करम या दोघांनाही बाद करून भारताला सुरवातीलाच यश मिळवून दिले आहे. यष्टीरक्षक एमएस धोनीने अमलाचा यष्टींमागे झेल घेतला. तर श्रेयश अय्यरने मार्करमचा सुरेख झेल घेऊन त्याला बाद केले.
अमलाला आज १९ चेंडूत फक्त १० धावा करता आल्या. त्याने मागच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करून एकाकी लढत दिली होती. मात्र आजही तशी खेळी करण्यात त्याला अपयश आले. प्रभारी कर्णधार मार्करमलाही मागील काही सामन्यांप्रमाणे आजही अपयश आले आहे. त्याने ३० चेंडूत २४ धावा केल्या.
सध्या स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स आणि खाया झोन्डो नाबाद फलंदाजी करत आहेत. दक्षिण आफ्रिकेचे १५ षटकात २ बाद ५९ धावा झाल्या आहेत.