विश्वचषक 2023 मध्ये मोठा उलटफेर मंगळवारी (17 ऑक्टोबर) नेदर्लंड्स संघ करू शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना नेदर्लंड्सने 43 षटकांमध्ये 8 बाद 245 धावा केल्या. तसेच प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला एकच्या पहिल्या चार विकेट्स स्वस्तात घेतल्या. एकंदरीत दक्षिण आफ्रिका संघ चांगलाच अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे.
246 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ मैदानात आल्यानंतर त्यांना पहिले चार झटके एकापाठोपाठ लागले. संघाची धावसंख्या 11.2 षटकात 44 असताना आफ्रिकेने पहिल्या चार विकेट्स गमावल्या होत्या. टेंबा बावूमा 16, क्विंटन डी कॉक 20, रासी वॅन डर ड्यूसेन 4, तर ऍडेन मार्करम 1 धाव करून तंबूत परतले. रॉल्फ वॅन डर मर्व याने सलामीवीर बावुमा आणि वॅन डर ड्यूसने यांच्या विकेट्स घेतल्या. कॉलीन एकरमन आणि पॉल वॅन मीकेरेन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
दरम्यान, रॉल्फ वॅन डर मर्व मुळचा दक्षिण आफ्रिकेचा आहे. मात्र, सध्या तो नेदर्लंड्ससाठी विश्वचषक खेळत आहे. परिणामी रॉल्फने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभांगामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली. फलंदाजाच्या रुपात त्याने 19 चेंडूत 29 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. कर्णधार स्कॉट ऍडवर्ड्सनंतर ही नेदर्लंड्ससाठी सर्वात मोठी खेळी ठरली. रॉल्फने दक्षिण आफ्रिका संघासाठी कारकिर्दीत 29 आंतरराष्ट्रीय सामने खेळळे आहेत. यातील 17 सामन्यांमध्ये आफ्रिकी संघ जिंकला, तर 10 सामन्यात पराभूत झाला. (South Africa lost their first four wickets cheaply against the Netherlands)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा, गेराल्ड कोएत्झे.
नेदरलँड्स – विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डौड, कॉलिन एकरमन, बास डी लीड, तेजा निदामनुरु, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), सीब्रँड एंजेलब्रेच, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन वॅन बिक, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन.